वॉशिंग्टन : नोबेल शांतता पुरस्कार अमेरिकेच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला World Food Programme (WFP) जाहीर झाला आहे. या संस्थेने गेल्या वर्षभरात १०० मिलियन लोकांना जेवण पुरवले आहे. शांतता पुरस्कारासाठी WHO, ग्रेटा थन्बर्ग, जॅकिन्डा अर्ड्रेन आमि सुदानमधील क्रांतीचे नेतेही चर्चेत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) शांततेचा नोबेल पुरस्कार झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. स्वीडिश अकादमीने या पुरस्काराची घोषणा केली. भूकबळी संपविण्यासाठी जागतिक अन्न मोहीम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था कार्यरत आहे.



आपत्कालीन परिस्थितीत ही संस्था जगाच्या पाठिवर कुठेही गरजूंपर्यंत अन्न पुरवठा करते. प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीच्यावेळी ही मोहीम राबवली जाते. जागतिक अन्न मोहीम निश्चित लोकसंख्येपर्यंत अन्न-आधारित सामाजिक सुरक्षा कवच सक्षम करण्यावर भर देण्यात आला होता.


या शांततेच्या पुरस्कारासाठी कोरोनाविरोधात लढणारी जागतिक आरोग्य संघटना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्याही नावाची चर्चा होती.