फ्रांस : जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती असतात. काही आपल्याला माहित असतात तर काही आपल्यासाठी नवीन असतात. प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते आणि तो देशा त्या त्या संस्कृतीसाठी ओळखला जाते. परंतु फ्रान्समधील एक शहर Cap d'Agde हेत्याच्या न्यूडिटी (Nudity) म्हणजे नग्नतेसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोकं कपड्यांशिवाय आरामात कुठेही फिरू शकतात आणि त्यांना हवं तसं आयुष्य जगु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सच्या समुद्राजवळील एक गावासारखे रिसॉर्ट आहे. त्याचे नाव Cap d'Agde आहे. हे गाव आपल्या अनोख्या जीवनशैलीसाठी जगभर प्रसिद्ध आहे आणि त्याची सर्वत्र चर्चा होत असते.


जगातील Cap d'Agde हे एकमेव ठिकाण आहे. जेथे पर्यटक दूरदूरून न्यूड टूरिज्मसाठी येतात. येथे प्रत्येकजण कपड्यांशिवाय फिरतो. येथे येणारे पर्यटकही कपड्यांशिवाय कुठेही फिरू शकतात यासाठी त्यांच्यावर कोणताही फाईन बसणार नाही.



या न्यूड सिटीमध्ये (Nude City) लोक शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये कपड्यांशिवाय फिरतात. कपड्यांबाबत त्यांना कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधनाचा सामना करावा लागत नाही. उन्हाळ्यात न्यूड लाइफचा आनंद घेण्यासाठी जवळपास 50 हजार लोकं येथे दरवर्षी पोहोचतात.


हनीमून डेस्टिनेशन म्हणून Cap d'Agde जगभरात प्रसिद्ध आहे. येथे येणारे हनीमून जोडपे हे कोणतीही पर्वा न करता फिरु शकतात.


एकीकडे कपड्यांशिवाय देखील Cap d'Agdeमध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु या शहराच्या बाहेर जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जोडीदारासोबत इंटीमेट सीन केल्यास किंवा जवळ आल्यास त्यांच्यावर दंड लावण्यात येतो.


सार्वजनिक ठिकाणी रोमांस केल्यास 12 हजार 860 पौंड इतका जबरदस्त दंड भरावा लागू शकतो. तसेच या शहरात राहण्यासाठी तुम्हाला फी देखील भरावी लागेल. एवढेच नाही तर, येथे कोणत्याही प्रकारचे फोटो काढण्यास मनाई आहे.