मुंबई : जगभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. प्रत्येकासाठी महामारीचा हा काळ अतिशय खडतर आहे. कोरोनाने माणसांना एकमेकांनापासून लांब राहण्यास भाग पाडलं. स्पर्श हा प्रत्येक आजारावर रामबाण उपाय असताना या कोरोनाने सगळ्यांना एकमेकांच्या स्पर्शापासून दूर ठेवलं. असं असलं तरीही एका नर्सने यावर खूप भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. त्यावेळी ब्राझीलच्या नर्सने मनाचा ठाव घेणारी एक अनोखी शक्कल लढवली आहे. कोरोनाबाधित आयसोलेशनमध्ये असलेल्या माणसाकरता या नर्सने ही शक्कल लढवली आहे. 


दोन डिस्पोसेबल हँड ग्लोवज एकमेकांना बांधून या नर्सने त्यामध्ये कोमट पाणी भरलं आहे. हे दोन्ही गोल्वज एखाद्या माणसाच्या हाताप्रमाणे कोरोनाबाधिताच्या हातावर ठेवण्यात येतात. जेणेकरून कोरोनाबाधिताला आवश्यक असलेला स्पर्श अनुभवता यावा. 



प्रत्येक आजारपणात माणसं जवळ असण्याची त्यांचा स्पर्श अनुभवण्याची प्रत्येक माणसाची वृत्ती झाली आहे. असं असताना आज कोरोनाने माणसांना माणसांपासून दूर केलं आहे. अशावेळी आपल्या माणसाची साथ सोबत असल्याची जाणीव हे हँड ग्लोज करून देतात. 


हा फोटो शेअर करताना एक पोस्ट देखील लिहिली आहे. यामध्ये 'द हँड ऑफ गॉड. ब्राझीलयन कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये नर्सने कोरोनाबाधिताला सोईचं झालं आहे. दोन डिस्पोसेबल हँड ग्लोज एकत्र करून त्यामध्ये कोमट पाणी भरण्यात आलं. हे हँड ग्लोज कोरोनाबाधिताच्या हातावर ठेवण्यात आलं. कोरोनाकाळात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या प्रत्येकाला सलाम... '
असतान हा महत्वाचा असताना एकमेकांचा स्पर्श 


सहवास ... स्पर्श ! रुग्ण बेडवर असतो तेव्हा त्याला जवळ कुणी तरी असावे असे वाटत असते. मात्र कोरोनोच्या या आजारात मानवी स्पर्श शक्य नसताना ब्राझील मधील कोविड वॉर्डमध्ये एका रुग्णाच्या हातावर हँडग्लोव्हस मध्ये कोमट पाणी भरून रुग्णांना असा आधार दिला जातोय. सलाम आरोग्य कर्मचाऱ्यांना! अशी पोस्ट सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.