मुंबई : एवरिथिंग इज पॉसीबल इन पॉसीबल इन लव अॅण्ड वॉर.... असंच काहीस या विमानात झालं आहे. एका व्यक्तीने विमानात एअर होस्टोसला प्रपोज केलं आहे. या दरम्यान एअर होस्टेसने तिला निराश केलं नाही. त्या प्रपोझचा स्विकार करून त्याच्या आनंद गगनात मावेनासा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये एका एअर होस्टेसचा बॉयफ्रेंड तिला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी फ्लाइटमध्ये चढला. फ्लाइट उडण्याच्या अर्धा तास अगोदर तो गर्लफ्रेंडजवळ गेला आणि गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केलं. एवढंच नाही तर एअर होस्टेसने देखील बॉयफ्रेंडला निराश नाही केला आणि प्रपोज स्विकारलं. 



या दोघांच नातं जवळपास 1 महिन्यापासून होतं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि तिला अनोखं प्रपोझ करण्यासाठी तो त्या एअर होस्टेसच्या विमानात चढला.यानंतर विमानातील सर्व वातावरणच बदललं आणि प्रवाशांनी टाळ्या वाजवून त्यांच्या प्रेमाचं कौतुक केलं. हा सर्व प्रकार एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला. आणि आता तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.