अर्भकाचं कापलेलं शीर डॉक्टर गर्भाशयातच विसरा आणि पुढे जे घडलं ते....
प्रसूतीदरम्यान अनेक समस्या डॉक्टर आणि महिलेला येत असतात. बाळ आणि आई दोन्ही सुखरुप राहावेत यासाठी सगळे प्रयत्न सुरू असतात. मात्र डॉक्टरांकडून एक मोठी चूक झाली आणि भयंकर प्रकार घडला.
सिंध : प्रसूतीदरम्यान अनेक समस्या डॉक्टर आणि महिलेला येत असतात. बाळ आणि आई दोन्ही सुखरुप राहावेत यासाठी सगळे प्रयत्न सुरू असतात. मात्र डॉक्टरांकडून एक मोठी चूक झाली आणि भयंकर प्रकार घडला.
अनुभवी डॉक्टरांच्या अभावाचा फटका मोठा बसला. महिलेच्या जीवाशी खेळ झाला आणि धक्कादायक प्रकार उघड झाला. डॉक्टरने चक्क महिलेची प्रसूती करताना शीर कापून धड बाहेर काढलं. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती आणखी खालवली तेव्हा तिला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
महिलेची तपासणी झाली त्यावेळी गर्भाशयात अर्भकाचं डोक राहिल्याचं लक्षात आलं. डॉक्टरने प्रसूती करताना अर्भकाचं डोकं कापून धड वेगळं केल्याचा भयंकर प्रकार घडला. शीर तसंच गर्भाशयात सोडलं होतं. त्यानंतर या महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. गर्भाशयातून अर्भकाचं डोकं काढण्यात आलं.
आरोग्य विभागातील कर्मचारी आणि डॉक्टरांचा हलगरजीपणा समोर आला आहे. ही धक्कादायक घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य विभागात घडली. तिथे अनुभवी डॉक्टरांची कमतरता असल्याने हा प्रकार समोर आला.
महिलेच्या जीवावर बेतलं होतं. मात्र तिचा जीव थोडक्यात वाचला आहे. डॉ. सिकंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भाशयात अर्भकाचं धड राहिल्याने मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे महिलेच्या जीवालाही धोका होता. वेळीच लक्षात आल्याने सुदैवानं या महिलेचा जीव वाचला आणि तिला लवकर उपचार मिळू शकले.
या प्रकरणी सिंध आरोग्य सेवा महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही धक्कादायक घटना पाकिस्तानमधील असल्याचं समोर आलं. आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे.