China Lockdwon : ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाव्हायरसच्या नवीन व्हेरिएंटने जगभरात पुन्हा एकदा दहशत पसरवली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनच्या अनयांगसह (Anyang) अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (China Lockdown) लागू करण्यात आला आहे. दोन कोटींहून अधिक लोक कडक लॉकडाऊनमध्ये आहेत. चीनच्या 'झिरो कोविड पॉलिसी' (China Zero Covid Policy) अंतर्गत खूप कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या धोरणांतर्गत चीन आपल्या नागरिकांवर अतिशय कडक नियम लादून कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने क्वारंटाइन कॅम्पचं (Quarantine Camps) मोठ्या प्रमाणावर नेटवर्क तयार केलं आहे. जिथे हजारो मेटल बॉक्स बनवले गेले आहेत. यामध्ये गरोदर महिला, लहान मुलांसह सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.


सर्वात कडक लॉकडाऊन
कोरोना महामारीच्या सुरुवातीला वुहान आणि उर्वरित हुबेई प्रांत बंद केल्यानंतरचा आतापर्यंतचा हा सर्वात कडक लॉकडाऊन आहे. सध्या, शियानमधील (Shiyan) सुमारे 125 दशलक्ष लोक आणि युझोऊमधील (Yuzhou) 10 लाखांहून अधिक लोक लॉकडाऊन अंतर्गत कैद आहेत. तर अनयांग शहरात 55 लाख लोकं घरांमध्ये बंद आहेत.


चीनमध्ये 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचं वर्णन 'जगातील सर्वात क्रूर लॉकडाऊन' म्हणून केलं जात आहे. यामध्ये जनतेवर अत्यंत क्रूर निर्बंध लादण्यात आले आहेत.


लोकं मेटल बॉक्समध्ये कैद
कोरोनाच्या भीतीने लोकांना दोन आठवडे एका छोट्या मेटल बॉक्ससारख्या खोलीत कैद केलं जात आहे. त्यात सोयीच्या नावाखाली बेड आणि शौचालय देण्यात आलं आहे. चिनी मीडियाने स्वत: याची छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये शिजियाझुआंग (Shijiazhuang) प्रांतातील 108 एकरच्या क्वारंटाईन कॅम्पसमध्ये हजारो लोकांना कसं कैद करण्यात आलं आहे हे दाखवलं आहे. हे कॅम्पस पहिल्यांदा जानेवारी 2021 मध्ये बांधलं गेलं.


लोकांचे भयानक अनुभव


या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. शीत धातूच्या पेटीत फारच कमी अन्न असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेकांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडलं जात आहे. इथे बसेस भरून लोकांना आणण्यात येत आहे.


एका व्यक्तीने सांगितलेला अनुभव फारच भयानक आहे. 'इथं इतर कोणतीही सुविधा नाही, कोणीही आम्हाला तपासायला आलं नाही, हे कसलं क्वारंटाइन सेंटर आहे? वृद्ध आणि लहान मुलांनाही इथं ठेवण्यात आले आहे. बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर मारलं जातं. असं या व्यक्तीने सांगितलं.


ओमिक्रोनचा धोका लक्षात घेता, लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे लॉकडाऊन किती काळ चालेल हे देखील स्पष्ट नाही.