नवी दिल्ली : अमेरिकेत (United State of America) कोविड -19 च्या ओमायक्रॉन प्रकारामुळे पहिला मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेक्सासमधील ओमायक्रॉनच्या 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाचे लसीकरण झाले नव्हते. तसेच त्याला इतर आरोग्याच्या समस्या देखील होत्या.


टेक्सासमधील आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, राज्यात ओमायक्रॉन या कोविड-19 प्रकाराशी संबंधित पहिला मृत्यू नोंदवला गेला आहे.


अमेरिकेतील ओमायक्रॉनच्या संसर्गाने मृत्यू झालेला हा पहिलाच रुग्ण आहे.


अमेरिकेत ओमायक्रॉ़नचा कहर सुरू


Omicron in US: जगातील 90 देशांमध्ये पोहोचलेला ओमायक्रॉनचा प्रकार अमेरिकेत अधिक वेगाने पसरू लागला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने इशारा दिला की, यूएसमधील 73 टक्के नवीन रुग्ण ओमायक्रॉनची आहेत.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.


कोरोनाचे नवीन प्रकार ओमायक्रॉन जगभरात वेगाने पसरत आहे. अमेरिकेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तेथे येणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांपैकी 73 टक्के रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहेत.


सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने ही माहिती दिली आहे. सीडीसीने म्हटले आहे की अमेरिकेत केवळ एका आठवड्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये 6 पट वाढ झाली आहे.


सीडीसीचा अंदाज आहे की अमेरिकेतील अनेक परिसरात हा आकडा आणखी जास्त आहे. न्यू यॉर्कमधील 90 टक्के नवीन रुग्ण ओमायक्रॉनने संसर्गीत आहेत. 


दरम्यान, अमेरिकेतील ओमिक्रॉनचा पहिला मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिले आहे की अमेरिकेत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे



ओमायक्रॉन किती घातक ?


Omicron प्रकार किती गंभीर आहे? यावर लस प्रभावी आहे की नाही? अशा गोष्टी अजून माहीत नाहीत. तथापि, सुरुवातीच्या अभ्यासात असे समोर आले आहे की लसीकरण झालेल्या लोकांना बूस्टर डोस लावून या संसर्गापासून संरक्षण मिळू शकते. त्यामुळे जगात बुस्टर डोस बाबत चर्चा सुरू आहे.