मुंबई : जगभरात एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी नोंद होत आहे. हायली ट्रान्समिसिबल वेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron cases) अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे वाढू लागली आहेत आणि 22 ते 28 डिसेंबर दरम्यान जागतिक स्तरावर मागील आठवड्याच्या तुलनेत 37 टक्के अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असे राष्ट्रीय डेटाबेसवर आधारित AFP वृत्तसंस्थेने म्हटले आहे. (France hit by daily record of over 2 lakh new Covid cases)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी WHO ने इशारा ही दिला होता की कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारात “खूप उच्च” धोका आहे आणि त्याचा परिणाम जगाच्या आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो.


युरोप मध्ये कोरोना संकट


22 ते 28 डिसेंबर दरम्यान एकूण 6.55 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली, जे मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (corona virus) साथीचा रोग घोषित केल्यापासून सर्वाधिक आहे. व्हायरसचे सर्वात मोठे संकट सध्या युरोपमध्ये पाहायला मिळत आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाने युरोपमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे आणि रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी सरकारला पुन्हा निर्बंध लादण्यास भाग पाडले आहे. 


ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी आहे, परंतु जागतिक आरोग्य संघटना अजूनही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करते आहे. युरोपमध्ये गेल्या सात दिवसांत 3.5 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ब्रिटन, फ्रान्स, ग्रीस आणि पोर्तुगाल या सर्व देशांमध्ये दररोज सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.


फ्रान्समध्ये 2 लाखांहून अधिक प्रकरणे 


युरोपीयन देश फ्रान्समध्ये 24 तासांत कोविड-19 च्या 2 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्री ऑलिव्हियर व्हेरन यांनी बुधवारी सांगितले की हा, एक नवीन दैनिक रेकॉर्ड आहे. मंगळवारी 179,807 प्रकरणे नोंदवण्यात आली होती परंतु बुधवारी हा आकडा 2,08,000 वर पोहोचला. "मी यापुढे ओमायक्रॉनला लाट म्हणणार नाही, मी त्याला त्सुनामी म्हणेन. गेल्या काही दिवसांपासून आम्ही जे आकडे पाहत आहोत ते पाहता आम्ही भूस्खलनाच्या दिशेने जात आहोत. फ्रान्सने बुधवारी नाइटक्लब बंद करण्याची मुदत आणखी तीन आठवड्यांनी वाढवली आहे.


अमेरिकेत एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद


मंगळवारी अमेरिकेत 265,427 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली. अमेरिकेतील दैनंदिन 252,000 प्रकरणांचा पूर्वीचा विक्रम मोडला. सुमारे एक वर्षापूर्वी, 11 जानेवारी रोजी, 252,000 प्रकरणे नोंदवली गेली. मात्र मंगळवारी 265,427 नवीन रुग्णांनी जुना रेकॉर्ड मोडला. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यापासून यूएस आणि जगभरात संक्रमण वेगाने पसरत असताना हा नवा विक्रम झाला आहे.


जानेवारी 2022 कठीण वेळ


ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन डॉ. आशिष झा म्हणाले, "जानेवारी हा खरोखरच कठीण जाणार आहे. आणि लोकांना फक्त एका महिन्यासाठी स्वत: ला तयार करावे लागेल. बऱ्याच लोकांना संसर्ग होणार आहे." AFP नुसार, कोविड-19 मुळे जगभरात 5.4 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु मृत्यूची संख्या दररोज सरासरी 6,450 वर आली आहे, जी ऑक्टोबर 2020 पासून सर्वात कमी आहे.