भारतात वेगाने पसरतोय OMICRON, तज्ज्ञांनी भारताला दिलाय गंभीर पाऊल उचलण्याचा इशारा
भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी आढळलेल्या कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन प्रकार भारत, यूके, ब्राझील आणि चीनसह अनेक मोठ्या देशांमध्ये पोहोचला आहे. ओमायक्रॉनचे 30 हून अधिक उत्परिवर्तन त्याच्या प्रसाराला गती देत आहेत. भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशासाठी हा मोठा धोका असल्याचे तज्ज्ञ मानत आहेत.
दक्षिण आफ्रिकन DSI-NRF सेंटर फॉर एक्सलन्स इन एपिडेमियोलॉजिकल मॉडेलिंग अँड अॅनालिसिस (SACEMA) चे संचालक ज्युलिएट पुलियम यांनी दावा केला आहे की ओमायक्रॉन प्रकार भारतात वेगाने पसरत आहे. एका मुलाखतीत, पुलियम यांनी चिंता व्यक्त केली की भारतातील रुग्णालय नियोजनाशी संबंधित बाबींसाठी तयार राहणे एक शहाणपणाचे पाऊल असेल.
पुलियम म्हणाले की, ओमायक्रॉनचा संसर्ग पूर्वी कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना देखील होत आहे. त्याचा प्रसार दर मागील सर्व प्रकारांपेक्षा खूप जास्त आहे. प्राथमिक डेटा सूचित करतो की पूर्णपणे लसीकरण झालेले लोक देखील नवीन प्रकारात संक्रमित होऊ शकतात.
ओमाक्रॉनपासून भारताला काय धोका आहे?
पुलियम म्हणाले की, ओमायक्रॉन संसर्गाची परिस्थिती जी दक्षिण आफ्रिकेत पूर्वी दिसली होती, ती आता जगभरातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. Omicron चे संक्रमण भारतात खूप वेगाने पसरेल असे तज्ञांचे मत आहे. भारतात डेल्टा प्रकारामुळे दुसऱ्या लाटेत वाईट परिस्थिती दिसून आली.
Omicron बाबत तज्ज्ञ म्हणाले की, 'ओमायक्रॉन संसर्गाच्या गंभीरतेबद्दल आम्हाला अजून फारशी माहिती नाही. मला वाटते की ज्यांना लसीकरण केले गेले आहे आणि ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे दिसू शकतात. खराब प्रतिकारशक्ती असलेल्यांवर त्याचा परिणाम मागील प्रकारांसारखाच असू शकतो. त्यामुळे रुग्णालय नियोजनाच्या बाबतीत बिकट परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.
बूस्टर डोस Omicron विरोधात लढण्यास सक्षम?
UK मधील काही पुरावे असे सूचित करतात की जे mRNA लसीचा (प्रामुख्याने फायझरची लस) बूस्टर डोस घेतात त्यांना नवीन प्रकाराच्या लक्षणांपासून काही प्रमाणात संरक्षण असल्याचे दिसून आले आहे.
मुलांना देखील Omicron पासून धोका आहे
पुलियम म्हणाले की, भारतात अद्याप मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू झालेला नाही. सुरक्षित राहण्यासाठी, मुलांना लसीकरण करून घेणे ही चांगली कल्पना आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी भारताने अद्याप बूस्टर डोस किंवा अतिरिक्त डोसचा निर्णय घेतलेला नाही. हा विषाणू वेगाने पसरत आहे, त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यास इतका वेळ लागू नये.