धान्य दळण्यासाठी या देशात आजही सुरु आहेत दीड हजार वर्षांपूर्वीच्या पवनचक्क्या
दीड हजार वर्ष जुन्या पवनचक्क्या
तेहरन : इराणमधील खोरासान प्रांतातल्या नश्तीफान गाव जगावेगळं आहे. कारण आहे या गावातल्या पवनचक्क्या. या पवनचक्क्या दीड हजार वर्ष जुन्या आहेत. नश्तीफान गावातील या पवनचक्क्यांचा वापर इसवी सन पाचव्या शतकात सुरु झाल्याची नोंद आहे. खोरासान प्रांतात हिवाळा आणि उन्हाळ्यात वारे वेगानं वाहतात.
एक हजार वर्षांपूर्वी या वाऱ्याचा वापर करून घेण्याची कल्पना इथल्या गावकऱ्यांना सूचली. त्यांनी वारं अडवण्यासाठी मातीचे आडोसे तयार केले. त्याच्यासमोर लाकडांवर लाकडी फळ्या गुंफून देशी पवनचक्की तयार केली. या पवनचक्क्यांची उंची जवळपास 65 फूट एवढी आहे.
आजही या पवनचक्क्या वेगानं चालतात. या पवनचक्क्यांच्या सहाय्यानं धान्य दळण्याचं काम सुरु केलं. आजही या गावात चाळीस पवनचक्क्या चालू अवस्थेत आहेत. 2002 मध्ये नश्तीफानच्या या पवनचक्क्यांना राष्ट्रीय ठेवा म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या पवनचक्क्या आजही कार्यान्वयीत आहेत. कधीही जा आणि धान्य दळून घ्या. एक हजार वर्षापूर्वीची लोकं विज्ञानाची उपासक होती याचं पवनचक्क्या आदर्श उदाहरण.