इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज शनिवारी झालेल्या स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून सहा जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरमध्ये शहरातील बाजारपेठेत एका बेकरीच्या आत हा स्फोट झाला.  जखमींना तात्काळ जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची अधिक चौकशी करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने जीओ टीव्हीच्या हवाल्याने दिले आहे.



२९ नोव्हेंबर रोजी लाहोरच्या चौबर्गी भागात अल कदसिया मशिदीजवळ रिक्षात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटानंतर सात जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आठवडाभरात हा दुसरा स्फोट झाला आहे.