Home Delivery of Bomb : माहिती नसताना जर एखादी भेटवस्तू आली तर ती कोणी पाठवली आणि त्यात काय पाठवलं असेल याची उत्सुकता लागलेली असते. मात्र एकाला आलेली भेटवस्तू उघडून पाहणं अंगाशी आलं आहे. कारण त्याला पार्सलमध्ये बॉम्ब पाठवण्यात आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण?
तरूणाचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, त्या मुलीला बॉयफ्रेंड होता. मात्र प्रेमात वेड्या झालेल्या तरूणाने संबंधित मुलीच्या BF ला संपवण्याचं ठरवलं आणि त्याला मारण्याचा कट आखला. यासाठी त्याने कोणी कल्पनाही करू शकणार नाही असं डोकं लावलं. आरोपी तरूणाने मुलीच्या BF च्या घरी एक पार्सल पाठवत त्यामध्ये बॉम्ब ठेवतो. 


असा बनवला बॉम्ब
आरोपी बाजारातून बॉम्ब बनवण्यासाठी लागणार साहित्य घेतो आणि घरीच बॉम्ब तयार करतो. त्यानंतर तो बॉम्ब त्या तरूणाच्या घरी पाठवतो. कोणी पार्सल पाठवलं आहे हे पाहण्यासाठी तो तरूण ते पॅकिंग जेव्हा उघडतो तेव्हा मोठा स्फोट होतो. यामध्ये तरूण गंभीर जखमी होतो. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात येतं. पोलिसात प्रकरण गेल्यावर सरव उलगडा होतो. 


पोलीस आरोपी तरूणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करतात तेव्हा सर्व प्रकार समोर येतो. हे प्रकरण अमेरिकेतील असून आरोपी मुलाचं नाव अलेक्झांडर मॅकॉय आहे. अलेक्झांडर ओहोयो इथं राहायला आहे. बॉम्ब फुटण्याची घटना जुनी आहे मात्र आता याचा निकाल आला असून आरोपी अलेक्झांडरला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.