अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी अबूधाबीमध्ये आहेत. या दरम्यान ओएनजीसी लिमिटेडने अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा केला आहे.


10 टक्के भाग भारताकडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओएनजीसी विदेश लिमिटेडने आबूधाबीच्या लोअर जाकुम कन्सेशनमध्ये 10 टक्के भाग खरेदी केला आहे. यासाठी 60 कोटी डॉलर देण्यात आले आहेत. अबूधाबीमध्ये कोणत्याही ऑईल फील्डमध्ये पहिल्यांदा भारतीय तेल कंपनीला भाग मिळाला आहे.


भारताला होणार फायदा


करारानुसार अबूधाबीच्या या ऑईल फील्डमधून निघणाऱ्या कच्चा तेलाचं 10 टक्के भागावर ONGC विदेश लिमिटेडचा हक्क असेल. 9 मार्च 2018 पासून हे लागू होणार आहे. या ऑईल फील्डमधून रोज 4 लाख बॅरल म्हणजे वर्षभराचं 2 कोटी टन कच्चं तेलाचं उत्पादन होतं. यामध्ये भारताला याचा 10 टक्के भाग मिळणार आहे. जसं जसं ऑईल फील्डमध्ये कच्चं तेलाचं उत्पादन वाढेल तसं भारताला ही त्याचा फायदा होईल. 2025 पर्यंत या ऑईल फील्डमधून दररोज 4.5 लाख बॅरल उत्पादन होण्याची शक्यता आहे.


पहिली कंपनी


ONGC विदेश लिमिटेड भारताच्या त्या 3 मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या क्षेत्रातल्या दुसऱ्या कंपन्या आहेत. सध्या ही कंपनी 18 देशांसोबत 39 ऑयल अँड गॅस प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. रोज यातून 2.77 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन होत आहे.