लाहोर : लहान मुलांवर अधिराज्य गाजवणाऱ्या टीव्ही कार्टून मालिकेवर गदा येण्याची शक्यता आहे. लहान मुलांवर नकारात्मक प्रभाव पडत असल्याचा आरोप करत पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची मागणी येथील एका आमदारांनी केली आहे. ही मागणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोरेमॉन हे जॅपनीज कार्टून आहे. पाकिस्तान पंजाबप्रांतातील आमदारांनी केली आहे. या कार्टूनचा लहान मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे या कार्टूनवर बंदी आणावी, अशी मागणी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे आमदार डॉ. मुराद रास यांनी केलेय. तसा त्यांनी पाकिस्तानमधील पंजाब विधानसभेत हा प्रस्ताव सादर केलाय.


पाकिस्तानात डोरेमॉन या कार्टूनवर बंदी असताना काही केबलचालक आणि टीव्ही चॅनल्स हे कार्टून दाखवत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. या लोकांकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केले जात असल्याचेही ते म्हणाले. येथील लहान मुले हे डोरेमॉनसारख्या कार्टूनचे अगदी सहज बळी पडतात, असे ते म्हणालेत. 


मात्र हे कार्टून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि मानसिकतेवर चुकीचा परिणाम करत असल्याने ते पूर्णपणे बंद करावे. या कार्टूनमध्ये वापरली जाणारी भाषाही अतिशय नकारात्मक आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे. दरम्यान, पाकिस्तानातील स्थानिक निर्मिती संस्थाही अशा पद्धतीच्या कार्टून सीरिजची निर्मिती करतात. त्यामुळे परदेशी कार्टूनची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.