Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 20 सेकंदाचा अवधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये अनेक भरलेल्या बाटल्यांमध्ये 5 रिकाम्या बाटल्या देखील लपवल्या आहेत. पण ते शोधण्यासाठी लोकांना मेंदूची कसरत करावी लागत आहे. (Optical Illusion Find 5 empty bottles in the photo you have 20 seconds mind game nz)


 


5 रिकाम्या बाटल्या शोधा


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चित्रात समुद्रात अनेक भरलेल्या बाटल्या तरंगत असल्याचे पाहू शकता. त्याच वेळी, बाटल्यांच्या आसपास तीन डॉल्फिन देखील उपस्थित आहेत. त्यातील एकाने चष्मा लावला असून ती काहीतरी वाचताना दिसत आहे. समुद्रात कचरा न टाकण्याचा संदेशही कलाकार दुडस यांनी डॉल्फिनच्या माध्यमातून दिल्याचे पाहायला मिळते. या बाटल्यांमध्ये 5 रिकाम्या बाटल्याही आहेत. आव्हान हे आहे की तुम्हाला त्या बाटल्या 20 सेकंदात शोधून सांगाव्या लागतील. मग उशीर कशाचा? त्या रिकाम्या बाटल्या शोधा. तुमची वेळ आता सुरू होत आहे.


 


ऑप्टिकल इल्युजन असलेले चित्र येथे पहा


चित्रात बाटल्या अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. आम्हाला वाटते की त्याला 20 सेकंदात शोधणे थोडे कठीण जाईल. म्हणूनच जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 5 सेकंदांचा अतिरिक्त वेळ घेऊ शकता. जे अजूनही बाटल्यांमध्ये अडकले आहेत, त्यांना जास्त काळजी करण्याची गरज नाही. या कोड्याचे उत्तर आम्ही तुम्हाला खालील चित्रात सांगत आहोत.


 



 


येथे परिणाम पहा


या चित्रात रिकाम्या बाटल्या कुठे लपल्या आहेत तुम्ही पाहिले आहे का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात रिकाम्या बाटल्या शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.