Optical Illusion : फोटोतला साप शोधून दाखवलात तर तुम्ही ठराल Genius
Optical Illusion मध्ये लपलेला हा साप शोधून दाखवा...
मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. यापैकी काही ऑप्टिकल इल्युझन्स आहेत. (Optical Illusion)ऑप्टिकल इल्युजन आपले डोळे आणि मेंदूची फसवणूक करण्यासाठी ओळखले जातात. असे अनेक ऑप्टिकल इल्युझन्स आहेत जे पाहिल्यानंतर आपल्याला वाटते की जे पाहिले ते योग्य आहे. असेच एक चित्र समोर आले आहे ज्यामध्ये एका सर्पमित्राच्या जवळ एक साप लपला आहे. आपल्याला या चित्रात साप कुठे आहे ते शोधायचं आहे
खरं तर, हे एक चित्र आहे ज्यामध्ये सर्पमित्र पूंगी वाजवत आहे आणि साप देखील आहेत. परंतु साप या चित्रात दिसत नाही, Optical Illusion चे हे चित्र मनाला भिडणारे आहे. अशी चित्रं मानवी मेंदूला चालना देतात आणि निरीक्षण कौशल्य वाढवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर Optical Illusion चित्राबद्दल बोलत असताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यास मदत करतो.
या चित्राची गंमत म्हणजे साप अजिबात दिसत नाही. चित्रात एक साप आहे ,एक बॉक्स देखील आहे पण त्यात साप नाही. यामुळे हा साप सहजासहजी दिसणार नाही. पण जर तुम्हाला हा साप सापडला तर तुम्ही प्रतिभाशाली आहात असं म्हणता येईल.
वास्तविक हा साप सर्पमित्राच्या समोर दिसत नसून त्याच्या डाव्या हातावर दिसतोय. हा साप हातावर पूर्णपणे गुंडाळलेला असून तो लपलेला आहे. हा साप चित्रात अशा प्रकारे सेट केला आहे की तो त्याच्या हातावर कापडासारखा दिसतो. पण नीट पाहिल्यास साप कुठे आहे हे कळते.