Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केल्या जाणाऱ्या आणि शोधल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी एक आहे. यातील चित्र काहीसे दिसतं पण प्रत्यक्षात ते वेगळेच असतात. ज्याप्रमाणे आपण शरीर निरोगी आणि चपळ ठेवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बुद्धी तीक्ष्ण ठेवण्यासाठी मेंदूच्या व्यायामाची गरज आहे. आता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही तुमच्या मेंदूचा व्यायाम कसा कराल? यासाठी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात, जे पाहून डोकं भणभणतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं अनेकदा घडतं जेव्हा आपल्या समोर काहीतरी असतं,  परंतु आपण ते पाहू शकत नाही. आता देखील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये चार वर्तुळ दिसत आहेत. 



पण फोटो पाहिल्यानंतर तुमचं डोकं भणभणेल आणि डोळे गरगरतील. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काही चौकोण दिसत आहेत. त्यामुळे डोळ्यासमोरूनही ओळखता येत नसलेली आणि गोंधळात टाकणारी चार वर्तुळे तयार होताना दिसत आहेत. 


यासोबतच हे चौकोण लहान पांढऱ्या आणि काळ्या रंगात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पाहण्याचा प्रयत्न केला तर डोकं भणभणेल आणि डोळे गरगरतील.


फोटोमध्ये तुम्हाला पाहणं कठीण होत असेल तर, आम्ही तुम्हाला एक छोटी हिंट देतो. फोटो पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे डोळे 90 टक्के बंद करायचे आहेत आणि फक्त 10 टक्के उघडायचे आहेत. ज्यामुळे तुम्हाला चारही वर्तुळे चांगली दिसतील.