Optical Illusion Viral Photo: ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि त्यातील दडलेल्या गोष्टी शोधणं हा रोजचा विषय ठरला आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी ऑप्टिकल इल्यूजन फोटो नजरेस पडला नाही तर चुकल्यासारखं वाटतं. कारण या फोटोमुळे आपला फावला वेळ पटकन निघून जातो. त्याचबरोबर बुद्धीचा कस देखील लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल इल्युजन फोटो कॉलिन मार्शल यांनी इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी येथील लेम्बेह येथे क्लिक केला आहे. या फोटोत तुम्ही समुद्रात गुलाबी वनस्पती पाहू शकता. या फोटोत दोन समुद्री घोडे लपले असून फक्त पाच सेकंदात शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. चला तर मग तुम्हीही चॅलेंज स्वीकारा आणि कामाला लागा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला हा फोटो लक्षपूर्वक पहावा लागेल आणि समुद्रातील घोडा कोठे आहे हे शोधून काढावे लागतील. फक्त पाच सेकंद असल्याने आपली नजर व्यवस्थितरित्या फोटोवर फिरवा. पण इतकं करूनही समुद्री घोडे दिसले नसतील काळजी करू नका. आम्ही तुम्हाला या फोटोतील समुद्री घोडे शोधून दाखवू. समुद्री घोड्यांचा रंग त्या वनस्पतीसारखाच आहे. त्यामुळे शोधणं कठीण होतं. पण जर हा फोटो तुम्ही निरखून पाहिला तर, तर तुम्हाला डोळे दिसतील. अगदी बरोबर तेच दोन समुद्री घोडे आहेत.


 


आता तुम्हाला समुद्री घोडे कुठे आहेत कळल्यानंतर दुसऱ्यांना चॅलेंज द्या. बघा त्यांची बौद्धीक क्षमता तुमच्या इतकी तल्लख आहे का? फक्त गंमत म्हणून एकमेकांना चॅलेंज देण्यात हरकत नाही. कदाचित त्यांना या फोटोतील समुद्री घोडे शोधण्यात अडचण येईल. तर त्यांना फोटोतील समुद्री घोडे शोधण्यात मदत करा.