कपटी चीन : भारतीय हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी
Indo-China border : भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. (Tensions on Indo-China border again)
नवी दिल्ली : india-china border dispute : भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. (Tensions on Indo-China border again) चीनने लडाख सीमेजवळ सैन्याची जमवाजमव केली. त्यानंतर भारतानेही मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात केल्या आहेत. ( India shifts Weapons to China border in Move) आता तर लडाखच्या पूर्व भागात झालेल्या तणावानंतर चीनने आपला मोर्चा उत्तराखंडकडे वळवला आहे. चिनी सैन्याने बॉर्डर पार करत भारतात घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. इतकच नाही तर चीनने भारताच्या हद्दीतील पायाभूत सुविधांचे नुकसान केले आहे.
प्रत्युत्तर, भारताच्या मोठ्या तोफा लडाखमध्ये तैनात
लडाखमध्ये काही दिवसांपूर्वी उठलेले वादळ शमले आहे, असे वाटत असतानाच कपटी चीनने पुन्हा डोकं वर काढले आहे. यावेळी चीनच्या रडारवर आहे उत्तराखंड. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 100हून अधिक चिनी सैनिकांनी सीमारेषा पार करत उत्तराखंडच्या बाराहौती भागात प्रवेश केला. याठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचं सांगण्यात येत आहे.
चीनने LAC वर तैनात केले 50 हजारांहून अधिक जवान
एका रिपोर्टनुसार 30 ऑगस्टला चिनी सैन्याने जवळपास 5 कि.मी. आत भारताच्या हद्दीत प्रवेश केला. त्यांच्याजवळ 50 हून अधिक घोडे होते. उत्तराखंडच्या बाराहौती भागापर्यंत हे सैन्य आलं होतं, त्यानंतर ते माघारी परतले. मात्र परतण्यापूर्वी त्यांनी या भागातील पूल उद्ध्वस्त केला.
उत्तराखंडचा बाराहौती भाग अतिशय संवेदनशील मानला जातो. सीमारेषेच्या वादामुळे याठिकाणी चीन सातत्याने हालचाल करत असतो. मात्र 30 ऑगस्टच्या प्रकारानंतर आयटीबीपी जवान सतर्क झालेत. याठिकाणी बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे.
पँगाँग लेक परिसरातल्या हिंसक घटनेनंतर भारत आणि चीन दोघांनी आपापलं सैन्य माघारी घेत चर्चा सुरू केलीय. मात्र उत्तराखंडतल्या घुसखोरीवरून चीनचे नापाक इरादे पुन्हा एकदा स्पष्ट झालेत..एकीकडे मैत्रीची, शांततेची भाषा करायची आणि दुसरीकडे छुपे वार करतच राहायचे हीच चीनची रणनीती राहिलीय. कावेबाज चीननं घुसखोरी करत भारताला पुन्हा एकदा डिवचले आहे. मात्र भारतीय सैनिक त्यांना डोकलामसारखा पुन्हा धडा शिकवतील एवढे नक्की.