गतवर्षात 50 हजार भारतीयांनी घेतले अमेरिकन नागरिकत्व
2015 च्या तुलनेत ही संख्या 8 हजारांनी वाढली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेने 50 हजारहून अधिक भारतीयांना 2017 मध्ये आपल्या देशाचं नागरिकत्व दिलयं. 2016 च्या तुलने ही संख्या 4 हजारांनी जास्त आहे. आंतरिक सुरक्षा विभागाने एका अहवालातून ही माहिती दिली आहे. 2017 मध्ये 50 हजार 802 भारतीयांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं. 2016 मध्ये 46 हजार 188 भारतीयांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं होतं.
याचा अर्थ गेल्यावर्षी 4 हजारहून अधिक भारतीयांनी अमेरिकनं नागरिकत्व स्वीकारलं.
8 हजारांनी संख्या वाढली
2015 च्या तुलनेत ही संख्या 8 हजारांनी वाढली आहे. 2015 मध्ये 42 हजार 213 भारतीयांनी अमेरिकन नागरिकत्व घेतलं.
अहवालानुसार 2017 मध्ये एकूण 7 लाख 7 हजार 265 विदेशी नागरिकांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं.
अमेरिकन नागरिकता मिळविणाऱ्या भारतीयांमध्ये जास्तीत जास्त लोकं हे कॅलिफॉर्नियातील असल्याचेही अहवालात आहे.