3 महिन्यांपूर्वी मालकाचं निधन; रोज कबरीवर जाऊन बसते ही मांजर
ही मांजर तिच्या मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनंतरही त्याच्या कबरीजवळ बसलेली दिसतेय.
सर्बिया : आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांची इमोशनल कहाणी तुम्ही ऐकली असे. अशामध्ये कुत्रे फार इमानदार मानले जातात. मात्र याबाबतीत मांजरही काही कमी नाहीये. सर्बियातील अशाच एका पाळीव इमानदार मांजरीचा फोटो सध्या खूप व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ही मांजर तिच्या मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनंतरही त्याच्या कबरीजवळ बसलेली दिसतेय.
दररोज मालकाच्या कबरीवर जाते मांजर
सर्बियाचे शेख मुआमेर झुकोर्ली यांचे 6 नोव्हेंबर 2021 रोजी निधन झालं. त्याच्या मृत्यूच्या 3 महिन्यांनंतरही त्यांनी पाळलेलं मांजर दररोज त्याच्या कबरीकडे येऊन बसतं. हाच कबरीजवळ बसलेल्या मांजरीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
ट्विटरवर एका युजरने या मांजरीचा कबरीजवळ बसलेला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मांजर झुकोर्लीच्या बर्फाच्छादित कबरीच्या वर बसलेली दिसतेय. पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'त्यांची मांजर अजूनही तिथेचं आहे' असं लिहिलंय.
मांजरीचे फोटो पाहून लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरवर कमेंट करताना लिहिलं की, ही मांजर खरोखरच भावूक झालीये. तर वेळी, काही युजर्स म्हणतात, मांजर किती इमानदार आहे. शिवाय काहींनी त्यांचे पाळीव प्राण्यांचे अनुभव शेअर केलेत.
याआधीही या मांजरीचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल . गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर रोजी, लवादर नावाच्या युजरने त्याच्या मालकाच्या मृत्यूनंतर कबरीवर उदासपणे बसलेल्या पाळीव मांजरीचा फोटो शेअर केला होता. हा फोटो देखील भरपूर व्हायरल झाला होता.