वॉशिंग्टन: जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध रान उठवण्याची एकही संधी न सोडणारा पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी सुरु असलेली आंदोलने लष्कराकडून दडपली जात आहेत. त्यासाठी पाकिस्तानने या परिसरातील नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. स्वातंत्र्याविषयी चकार शब्दही काढायाच नाही, असा इशारा पाकिस्तानकडून या नागरिकांना देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारांनी या भागातील स्थानिकांशी संवाद साधला. त्यावेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराला मोठ्याप्रमाणावर स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनांचा सामना करावा लागत असल्याची माहिती पुढे आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर या भागातील सैन्याचा बंदोबस्त आणखीनच वाढल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने दिली. 


याशिवाय, भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी आणखीनच चेकाळले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निशाण्यावर येऊ शकतो, अशी भीती लष्करी अधिकाऱ्यांना वाटत आहे. 


पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार, भारतीय शिष्टमंडळाचे प्रत्युत्तर


मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिवसेंदिवस स्वातंत्र्य चळवळींना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. परंतु, पाकिस्तानी यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांकडून ही बाब दडवली जातेय. तसेच या भागातील मोबाईल फोन इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. 


पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको!


यामुळे स्थानिक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केल्याचेही समजते. या भागात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.