Resque Operation : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी केबल कार (Cable Car) मध्येच बंद पडल्याने एकच खळबळ उडाली. या केबलकारमध्ये सहा विद्यार्थ्यांसह (Student) एकूण आठ जण प्रवास करत होते. 900 फूट उंचीवर तब्बल नऊ तास हे सर्व जण अडकले होते. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सेनेच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. अथक प्रयत्नांनंतर अखेर या सर्वांची सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या (Pakistan) पख्तून भागातील बट्टाग्राम जिल्ह्यातील ही घटना आहे. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेज ग्रुपने हेलिकॉप्टरच्या मदतीने या सर्वांची सुखरुप सुटका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केबर कार ही इथल्या स्थानिक लोकांच्या प्रवासाचं साधन आहे. पहाडी भाग असल्याने इथे प्रवासाठी कोणताही रस्ता किंवा ब्रिज नाही. केबल कारसाठी लावण्यात आलेल्या दोन तारा तुटल्याने जवळपास 900 फूट उंचावर केबल कार बंद पडली. यात सहा विद्यार्थी असल्याने प्रकरण गंभीर बनलं. खाली केवळ दरी आणि पहाडी भाग होता. त्यामुळे पाकिस्तान आर्मिच्या जोडीला पाकिस्तान एअरफोर्सचं हेलिकॉप्टरही रेस्क्यू ऑपरेशनम्ये सहभागी झालं. पण वेगाने वारे वाहात असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे निर्माण होत होते. 


पाकिस्तानमधल्या डॉन न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार केबल कार दरीच्या मधोमध अडकली होती. दरीच्या सर्व बाजूला डोंगराळ भाग आहे. केबल कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाटी सैन्याने स्लिंग ऑपरेशन सुरु केलं. पण वादळी वाऱ्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केबल कार जोरजोरात हलत होती. त्यामुळे आतमध्ये बसलेले विद्यार्थी किंचाळत होते. 


या दरम्यान केबल कारमध्ये अडकलेल्या एका वीस वर्षांच्या मुलाने आपल्या पालकांना फोन करत जवळचं पाणीही संपल्याचं सांगितलं. आमच्याबरोबर 16 वर्षांचा एक मुलगा असून त्याला ह्दयाचाविकार असल्याचं त्याने दिलं. जवळपास तीन तास हा विद्यार्थी बेशुद्ध होता.पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान (Pakistan PM) अनवारुल हक ककार यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहली त्यांनी तात्काळ पाकिस्तान आर्मीला बचाककार्याचे निर्देश दिले. अखेर तब्बल नऊ तासांनंतर केबल कारमधल्या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली. 


केबल कारने विद्यार्थी करकात जीवघेणा प्रवास
डोंगराळ आणि दरी-खोऱ्याचा भाग असल्याने इथल्या स्थानिक नागरिकांना केबल कारने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. नदी आणि डोंगर पार करण्यासाठी इथे कोणताही रस्ता किंवा ब्रिज नाही. दररोज जवळपास 150 विद्यार्थी केबल कारने प्रवास करतात.