इस्लामाबाद : दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ पाहता अखेर पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून देशाच्या सीमांतर्गत भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची बाब स्वीकारण्यात आली आहे. दहशतवादी आणि जिहाद्यांचा यात समावेश असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे दहशतवादावर आणखी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मतही पाकिस्तान सैन्यातर्फे मांडण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही बऱ्याच अतिरेकी संघटनांवर यापूर्वीच बंदी घालत त्यांच्या मुसक्या आवळल्याची माहिती पाकिस्तानच्या मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. 


पाकिस्तानात दहशतवादाला आळा घालण्यासाठी फार गोष्टी केल्या जाण्याची गरज असल्याचं म्हणत आतापर्यंत या साऱ्यामध्ये इस्लामाबादला दहशवादामुळे मोठं नुकसान पोहोचल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. दहशतवादामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचंही ते यावेळी म्हणाले. 


पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारला दहशदवादाशी लढा देण्यात आलेल्या अपयशामुळेच देशाचा मोठा आर्थिक फटका बसल्याची बाब त्यांनी यावेळी सर्वांसमोर ठेवली. 


'देशात काही मोठ्या कारवाया सुरू असतानाच कायदा व सुव्यवस्था यंत्रणाही त्यातच व्यग्र होत्या, ज्यामुळे परिणामी बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कोणतीही रणनिती आखण्यात आम्ही अपयशी ठरलो, जे की आम्ही आज करु शकत आहोत', असं गफूर म्हणाले. 


रॉ वरही केले गंभीर आरोप 


भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ वरही गफूर यांनी काही गंभीर आरोप केले. पश्तून तहफूज मुव्हमेंट (पीटीएम) ला आर्थिक पाठबळ देण्याता आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेविकोधात जात मानवी हक्कांविरोधात गेल्याची बाब समोर आणत पश्तुन समाजाला भडकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. 


पाकिस्तानच्या भूमित असणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा संभव नसल्याची बाब भारताकजून स्पष्ट करण्यात आल्यानंतर गफूर यांची ही भूमिका सर्वांसमोर आली. 


पाकिस्तानच्या संयमाची भारताने परीक्षा घेऊच नये, असं म्हणत आपल्याकजडू यापूर्वीही प्रत्युत्तरात हल्ला करण्यात आलेला नह्ता; कारण आपल्याला शांतता प्रिय असल्याचं मत त्यांनी पुन्हा एकदा मांडलं.