Pakistan Anju Received An 40 Lakh Rupees Home: भारतामधून पाकिस्तानला गेलेल्या अंजू या भारतीय महिलेबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन 'फातिमा' झालेल्या अंजूवर पैशांचा वर्षाव होताना दिसतोय. अंजूला अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी भेटवस्तू म्हणून देत आहेत. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील पत्रकार दिलीप कुमार खत्री यांनी अंजू आणि नसरुल्लाहने एकत्र डिनर केल्याच्या व्हिडीओनंतर 2 अन्य व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केले आहेत.


कागदपत्रं अंजूकडे सोपवली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप कुमार खत्री यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंना दिलेल्या कॅप्शनमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. "पाकिस्तानमधील प्रसिद्ध उद्योजकाने अंजूला लग्नानंतर एका 10 मजल्याच्या इमारतीमध्ये 40 लाखांहून अधिक किंमत असलेला फ्लॅट भेट म्हणून दिला आहे," अशी कॅप्शन दिलीप कुमार खत्री यांनी या पोस्टला दिली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अंजूला कपडे आणि शाल भेट देताना दिसत आहे. त्यानंतर ही व्यक्ती फ्लॅटचे कागदपत्रं अंजूकडे सोपवत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 



ती आनंदात आहे का?


पाकिस्तानमधील हा उद्योजक नेमका कोण आहे याबद्दलची सविस्तर माहिती समोर आली नाही. अंजूला नेमक्या कोणत्या भागातील 10 मजली इमारतीमध्ये फ्लॅट भेट देण्यात आला आहे याचीही माहिती समोर आलेली नाही. दिलीप कुमार खत्री यांनी अंजूच्या भूमिकेसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले आहेत. "अंजूला अनेकजण लग्नानिमित्त भेटवस्तू देत आहेत. मात्र मूळ प्रश्न हा आहे की अंजू आनंदात आहे का?" असं दिलीप कुमार खत्री यांनी ट्वीटरवरुन विचारलं आहे.



फेसबुक फ्रेण्ड ते पाकिस्तानमध्ये पलायन



 


अंजू तिचा फेसबुकवरील मित्र आणि प्रियकर नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामध्ये गेली होती. त्यानंतर अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी अंजूचा एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये अंजू इस्लाममधील पारंपारिक पेहरावामध्ये तिचा प्रियकर आणि लग्नानंतरचा नवरा नसरुल्लाहसोबत भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहे. 34 वर्षीय अंजूचा जन्म हा उत्तर प्रदेशमधील कैलोर गावात झाला असून ती राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहत होती. 2019 मध्ये अंजू आणि नसरुल्लाहची फेसबुकवरुन मैत्री झाली.