नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला घेरण्यासाठी योजना आखली आहे. सर्वच स्तरावर पाकिस्तानची गळचेपी करण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने लाइन ऑफ कंट्रोल (एलओसी) वर लष्कर आणि रणगाड्यांची संख्या वाढवली आहे. पाकिस्तानकडून फायरिंग होण्याची शक्यता असल्याने राजौरीच्या नौशेरा सेक्टरमधील एलओसीच्या जवळील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यास संरक्षणासाठी भारतीय जवानांनी बंकर बनवण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सीमा भागातील लोकांना गाव खाली करण्यासाठी सांगितलं आहे. यासाठी पाकिस्तान सरकारकडून एक पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात, भारतीय लष्कराकडून कधीही हल्ला होऊ शकतो असं म्हटलं आहे. त्यामुळे एलओसीच्या जवळच्या गावांचं मोठं नुकसान होऊ शकतं. रात्री अंधारात चुकूनही काहीही जाळू नका. बंकरमध्ये राहा. गर्दी करुन एका ठिकाणी थांबू नका असं देखील या पत्रकात म्हटलं आहे.


पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला भीती आहे की, भारत त्यांच्यावर कधीही हल्ला करु शकतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील सुरक्षा सल्लागारांची बैठक घेतली. इंटेलिजेंस चीफ, आर्मी चीफ आणि सगळे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या हल्ल्यापासून सावध राहण्यासाठी लोकांना आवाहन केलं जात आहे. घराबाहेर न पडण्याचं आवाहन लोकांना करण्याच येत आहे. बलुचिस्तानमधील रुग्णालयांना २५ टक्के बेड रिझर्व्ह ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.