कोलंबो : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अंतर्गत प्रश्न उपस्थित करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पुढे आले आहे. मात्र, यावेळीही पाकिस्तानला चांगलेच प्रत्युत्तर मिळाले आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचे चांगलेच अंगलट आले आहे. भारतीय शिष्टमंडळाने जोरदार खडेबोल सुनावल्यानंतर पाकिस्तानचे शिष्टमंडळ गारद झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेतील यूनिसेफच्या एका परिषदेमध्ये पाकिस्तानने काश्मीर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करताच भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि भाजपचे संजय जैसवाल यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे दावे पूर्णपणे खोडून काढले. 


खासदार गौरव गोगोई यांनी केवळ प्रत्युत्तर दिले नाही तर पाकिस्तानमधील कायदा आणि अल्पसंख्यांवरील अत्याचाराबाबतही त्यांना खडेबोल सुनावले. काश्मीर मुद्द्यावर सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि काश्मीर जनतेचा आवाज ऐकला जाईल. मात्र कोणा तिसऱ्या देशाला या मुद्द्यावर बोलण्याचा काही अधिकार नसल्याचे सुनावले. पाकिस्तानने आधी आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे, असंही भारतीय खासदरांनी पाकिस्तानली शिष्टमंडळाला सुनावले.