भारताच्या शेजारील देशही ब्लू व्हेल गेमच्या विळख्यात
ऱशियातून सुरु झालेला ब्लू व्हेलचा विळखा जगभरात पसरत चाललातय. भारतातही अनेक मुले या गेमची शिकार झाले. देशातील पहिली घटना मुंबईतून समोर आली. मनप्रीत नावाच्या एका मुलाने छतावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक राज्यातील घटना समोर येत गेल्या. तामिळनाडू, राजस्थान, झारखंड, केरळ, चंदीगड या राज्यांमध्ये या घटना समोर आल्या.
इस्लामाबाद : ऱशियातून सुरु झालेला ब्लू व्हेलचा विळखा जगभरात पसरत चाललातय. भारतातही अनेक मुले या गेमची शिकार झाले. देशातील पहिली घटना मुंबईतून समोर आली. मनप्रीत नावाच्या एका मुलाने छतावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक राज्यातील घटना समोर येत गेल्या. तामिळनाडू, राजस्थान, झारखंड, केरळ, चंदीगड या राज्यांमध्ये या घटना समोर आल्या.
ब्लू व्हेल गेमच्या विळख्यात आता पाकिस्तानातील मुलेही अडकू लागलीत. हा धोकादायक गेम खेळल्यानंतर अनेक मुले तणावाखाली असल्याचे आढळलेय. इतकंच नव्हे तर त्यांना रुग्णालयात न्यावे लागले.
पेशावरच्या खैबर टीचिंग हॉस्पिटलमध्ये एका मुलीसह पाच किशोरवयीन मुलांमध्ये तणावाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना काऊंसेलरकडे नेण्यात आले. तेथील मनोचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी हा गेम खेळण्यास सुरु केल्यानंतर जसजसे ते पुढील स्टेप्सकडे जातात त्यांच्यात बदल होण्यास सुरुवात झाली. एका स्टेप्समध्ये त्यांना हातावर ब्लेडने व्हेलचे चित्र बनवण्यास सांगण्यात आले. एका पीडित मुलीने तर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.
जगभरात नोव्हेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ पर्यंत या गेममुळे १६० आत्महत्यांची नोंद झाली. दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तानात अशी कोणती घटना घडली होती.