Imran Khan Wife : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि इम्रान खान ऑडिओ लीक प्रकरण अजुन शांत नाही झालं तर राजकारणात नवा भूकंप आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची रहस्यमय पत्नी बुशरा बीबी यांच्याबाबत एका हॅकरने खळबळजनक खुलासा केला आहे. (pakistan bushra bibi wanted make a nude video of maryam nawaz claims hacker Marati News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी टीव्ही चॅनल 24HD नुसार हॅकरचे म्हणणं आहे की, पीएमएल-एनचे नेते नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज तुरुंगात असताना बुशरा बीबीच्या सांगण्यावरून मरियमच्या बाथरूममध्ये एक गुप्त कॅमेरा बसवण्यात आला होता. मरियमचा अंघोळ करतानाचा न्यूड व्हिडिओ बनवण्याचा त्याचा उद्देश होता. जेणेकरून ते ब्लॅकमेल करू शकतील.


या हॅकरने इम्रान खान यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खानच्या काही सवयी इतक्या घाणेरड्या आहेत की कोणी कल्पनाही करू शकत नाही. हॅकरने इम्रान खानचा एक ऑडिओही जगासमोर आणणार असल्याचं सांगितलं आहे. 


हॅकर म्हणाला, ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता की इम्रान फोनवर कोणालातरी शिवीगाळ करत होता. त्याचसोबतच हॅकरने इम्रान खानची पत्नी बुशरा बीबीचा ऑडिओही प्रसिद्ध करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. नवाझ शरीफ तुरुंगातून जिवंत परत येऊ नयेत अशी बुशरा बीबीची इच्छा असल्याचं हॅकर म्हणाला.


हॅकरने सांगितले की, बुशरा बीबीला इम्रान खानच्या आधी दुसर्‍या पाकिस्तानी राजकारण्याशी लग्न करायचं होतं. मात्र तिने कोणत्याही पिरी-फकीरीशी लग्न करणार नसल्याचे सांगत लग्नास नकार दिला होता. त्यानंतर तिने इम्रान खानशी लग्न केलं. त्यासाबोतच इम्रान खानला वादग्रस्त टिकटॉकर हरीम शाहला मारायचं होतं, असा दावाही हॅकरने केला आहे. हरीम शाहने इम्रान खानबद्दल अनेक वादग्रस्त दावे केले होते. त्यामुळे बहुधा इम्रान खान यांना त्याला मारायचं असल्याचं हॅकरने म्हटलं आहे.