जेव्हा एखाद्यावर प्रेम (Love) जडतं तेव्हा त्या व्यक्तीला जात-धर्माची पर्वा नसते किंवा गरीब-श्रीमंत याचा फरक पडत नाही. प्रेमात माणूस असा हरवून जातो की त्याला फक्त त्याला फक्त आपलं प्रेम मिळवायचे असते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानातून (pakistan) समोर आला आहे. पाकिस्तानात एका श्रीमंत कुटुंबातील मुलीने तिच्या ड्रायव्हरसोबत (Driver) विवाह (marriage) केल्याची घटना समोर आली आहे. विवाहाआधी या मुलीला तिच्या ड्रायव्हरच्या (Driver) एका स्टाईलने इतके प्रभावित केले की तिने आपले उर्वरित आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली पाकिस्तानला मुलाखत देताना मुलीने सांगितले की, आधी ड्रायव्हर असलेला तिचा नवरा तिला गाडी शिकवायला घेऊन जायचा. गाडी शिकत असताना त्याची गीअर (gear) बदलण्याची शैली खूप आवडली. ड्रायव्हर ज्या पद्धतीने गीअर बदलायचा, ते पाहणे मुलीला आवडायला लागले. त्याची स्टाईल (Style) मुलीला इतकी आवडली की तिने आपले मन ड्रायव्हरला दिले.


मुलाखतीदरम्यान, जेव्हा महिलेला विचारले गेले की तिला तिच्या पतीसाठी कोणते गाणे गायचं आहे. तेव्हा तिने 'हम तुम एक कमरे में बंदो और चावी गुम हो जाये' या हिंदी गाण्याचे नाव घेतले. यासोबतच गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीही म्हणून दाखवल्या.  पत्रकाराने गमतीने तिच्या नवऱ्याला 'चाबी गायब' असे म्हटले तेव्हा ड्रायव्हर नवरा हसला आणि म्हणाला की आता गाडीही गायब आहे.


प्रेमविवाहानंतर दोघेही खूप आनंदी 


पाकिस्तानचे हे नवविवाहित जोडपे एकत्र खूप आनंदी दिसत आहे. मुलाखतीदरम्यानही मुलगा आणि मुलगी दोघांनीही सर्व प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली. विशेष म्हणजे लग्नानंतर आता घरच्या ड्रायव्हरची घरात सुनेसारखी एन्ट्री होणार आहे. मुलीने सांगितले की, "मला कार शिकतानाच तिचे प्रेम मिळाले. गाडी शिकत असताना मला ड्रायव्हरची शैली आवडली. मला त्याच्या सगळ्या सवयी आवडल्या. गाडीचे गीअर्स बदलण्यासाठीची पद्धत मला विशेष आवडली. जेव्हा माझा नवरा ड्रायव्हिंग शिकवताना गीअर्स बदलायचा तेव्हा मला नेहमी त्याचा हात धरायचा मोह व्हायचा. तेव्हाच माझं त्याच्यावर प्रेम जडलं." दोघांच्या नशिबात हेच लिहिलं होतं आणि अखेर आज दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची शपथ घेतली आहे.