कराची : इम्रान खान आणि त्यांची पार्टी पाकिस्तान  तहरीक-ए-इंसाफ तीन महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये इम्रान खान यांना त्यांच्याच पार्टीतील नेत्याने अक्षरश: लाज आणली. नेत्याने भरकार्यक्रमात केलेलं लाजीरवणं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यात इम्रान खान यांच्या पक्षाचा एक नेता सध्या चर्चेचा विषय ठरला. त्याच्या चर्चेचे कारण एक विधान नसून त्याची एक कृती आहे, पीटीआय नेते शेख रशीद अहमद यांनी पक्षाच्या रॅलीत मंचावर इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार शाहबाज गिल यांना जबरदस्ती किस्स करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गिल स्वतःला वाचवताना दिसले.


पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांनी अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कहूता येथे रॅलीचे आयोजन केलं होतं. या रॅलीत इम्रान खान यांच्यासोबतच पक्षाचे अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. नेते मंचावर आपली भाषणे देत होते. 


शेख रशीद समोरच्या रांगेत खुर्चीवर बसले होते. शाहबाज गिल मागून शेख रशीदला भेटायला आले आणि त्याच्या कानात काहीतरी पुटपुटले. यानंतर शेख रशीदने शाहबाज गिल यांचं डोकं पकडून जबरदस्तीनं किस्स घेण्यात येत असल्याचं दिसत आहे. 


यादरम्यान शाहबाज गिल यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेख रशीद अजिबात थांबले नाहीत. त्यांनी डोकं पकडून त्यांना पुन्हा जवळ ओढायचा प्रयत्न केला. कसंबसं शाहबाज यांनी स्वतःची सुटका करून घेतली.



शेख रशीद अहमद यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेख रशीद यापूर्वीही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. इम्रान खान सरकारमध्ये ते गृहमंत्री आणि रेल्वेमंत्रीही होते.