World News : पाकिस्तानला सध्या पुराचा तडाखा बसत आहे. देशातील अनेक भागात पूराचा फटका लोकांना बसला असून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती सुरु असताना पाकिस्तानमध्ये महागाईचा फटका देखील बसत आहे. भाज्या आणि फळांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करू शकते. (Pakistan may import tomato and onion from India amid a surge in vegetable prices)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरमध्ये टोमॅटोचा भाव 500 रुपये किलो तर कांद्याचा भाव 400 रुपये किलो झाला आहे. तर 1 किलो बटाटा 120 रुपयांवर पोहोचला आहे. आगामी काळात खाद्यपदार्थांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कांदा आणि टोमॅटोचा भाव 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. (onion and tomato price increase)


सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये टोमॅटो (Tomato) आणि कांद्याचा (Onion) पुरवठा केला जात आहे. पण त्यातून पाकिस्तानची गरज पूर्ण होत नसल्याने पाकिस्तान भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करु शकतो. 


पाकिस्तान (Pakistan) गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा सामना करत आहे. सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकार विरोधात रोष वाढत आहे.3


पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-diesel Rate) ही आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे इतर वस्तूंचे दर देखील वाढत आहेत.