इस्लमाबाद : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात (Petrol-Diesel Price) गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. शेजारील देशात डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डीझेलच्या दरात 4 रुपये 26 पैशांनी कपात झाली आहे. याशिवाय पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर 1.45 रुपयांनी वाढ झाली आहे. (pakistan diesel prices decresed by Rs 4 26 and petrol hiked by rs 1 45 per liter know all rates of fuel)


पाकिस्तानात महागाईचा 'भडका'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. महागाईने हैराण झालेल्या पाकिस्तानला आता पेट्रोलचे दर वाढल्याने फटका बसतोय.  आजही पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


पेट्रोलचे दर किती? 


पाकिस्तानमध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 1.45 रुपयांनी वाढले आहेत. त्यानंतर एक लिटर पेट्रोलची किंमत ही तब्बल 235.98 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे.


डीझेलचा भाव किती? 


डीझेल 4.26 रुपयांनी स्वस्त झालं आहे. डीझेलच्या दरात करण्यात आलेल्या कपातीनंतर नवे दर 247.43 रुपये प्रतिलिटर असे आहेत. 


पाकिस्तानातील इंधनचे दर


पेट्रोल - 237.43 रुपये प्रतिलीटर
डीझेल - 247.43 रुपये प्रतिलीटर
केरोसीन -  202.02 रुपये/प्रतिलीटर