Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. ज्या मुद्द्यांवर शाहबाज सरकार सत्तेवर आले, आता तेच मुद्दे त्यांच्यासमोर आव्हान म्हणून उभे राहिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच सरकारने पेट्रोलच्या दरात 30 रुपयांची वाढ केली, त्यामुळे जनतेला मोठा फटका बसला आहे. इस्लामाबाद विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने वाढत्या किमतींचा निषेध करताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणासमोर एक विचित्र मागणी केली आहे. गाढवावर स्वार होऊन कार्यालयात येऊ द्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.


कंपनीने सांगितलं हा मीडिया स्टंट
कर्मचाऱ्याने केलेली मागणी ही केवळ मीडिया स्टंट असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने कर्मचाऱ्यााल गाढवाऐवजी इस्लामाबाद-रावळपिंडी मेट्रोने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. केवळ माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहिण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं. 


पाकिस्तानमध्ये एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत पेट्रोलचे दर एकूण 60 रुपयांनी वाढले आहेत. गुरुवारी शाहबाज सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 30 रुपयांची वाढ केली. नवीन किमतींनुसार पाकिस्तानमध्ये पेट्रोल 209.86 रुपये प्रति लिटर, हाय-स्पीड डिझेल 204.15 रुपये, रॉकेल 181.95 रुपये आणि लाईट डिझेल 178.31 रुपये दराने विकलं जात आहे. सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. 


इम्रान खान यांच्याकडून भारताचं कौतुक


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. पाकिस्तानी सरकारने इंधनाच्या किमतीत 30 रुपयांनी वाढ केली आहे, तर भारताने २५ रुपयांनी तेलाची किंमत कमी केली आहे. हे गुलाम आणि स्वंतत्र देशांतील निर्णय घेण्याचा फरक दर्शवतं, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.