Pakistan Economic Crisis : जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट असतानाच पाकिस्तानातही परिस्थिती वेगळी नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या देशावर असणारं आर्थिक संकट काही केल्या शमण्याचं नाव घेत नसून, त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था पूरती कोलमडली आहे. पाक सरकार वारंवार इंटरनेशनल मॉनेट्री फंड (IMF)कडून बेलआऊटची मागणी करताना दिसत आहे. पण, आयएमएफची नियमावली इतकी क्लिष्ट आहे की पाकला देशासाठी आर्थिक मदत मिळवम्यात कैक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका सामान्य जनतेला बसताना दिसत असून, इथं एका घासासाठीही नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानमध्ये सध्याच्या घडीला पीठ 800 रुपये आणि तेल 900 रुपये प्रतिकिलो इतक्या दरानं विकलं जात आहे. दैनंदिन जीवनातील कामांसाठीसुद्धा नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागत असल्यामुळं इथं नागरिकांकडील आर्थिक स्त्रोतही कमी पडताना दिसत आहेत. 


सर्व संकटं एकाच वेळी ओढावलेली असताना पाकचा रुपया कोसळला आहे. फक्त खाण्यापिण्याच्याच नव्हे, तर इथं आरोग्याच्या सुविधा, शिक्षणासह इतरही अनेक गोष्टींसाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळं पाकमधील मध्यमवर्गीय आणि त्याखालील उत्पन्नगटातील नागरिक हतबल झाले आहेत. 


हेसुद्धा वाचा  : TATA चा हा शेअर म्हणजे पैशांचा पाऊस; 5000 टक्क्यांहून अधिक परतावा देतोय स्टॉक; ही कंपनी करते तरी काय? 


देशाची आर्थित स्थिती सामान्यांच्या हाताबाहेर जात असतानाच स्थानिक सत्ताधारीसुद्धा त्यावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं आयएमएफकडून सातत्यानं सब्सिडी संपवण्यासाठी दबाव वाढत असतानाच तरीही पाक सरकारनं देशाच्या संरक्षणासाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये 15 टक्क्यांची वाढ केली आहे, ज्यामुळं सध्या पाकिस्तान सरकारनं जनतेचा रोष ओढावला आहे. 


पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्या माहितीनुसार देशाच्या जीडीपीनं आता 3.6 टक्क्यांच्या वेगानं पुढे जाणं अपेक्षित आहे. मागील वर्षीचे आकडे पाहता यंदा हा आकडा 0.1 टक्क्यांनी जास्त आहे. पण, जाणकारांच्या मते मात्र पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर येत्या काळात 2.38 टक्के इतकाच टप्पा ओलांडू शकते. 


सरकारी तिजोरीतील पैसा जातोय कुठे?


पाकिस्तानचं कथित मित्रराष्ट्र चीन सध्या या देशापुढं कर्जाचं जाळं पसरवत असून, हा देश या जाळ्यात वाईटरित्या फसताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकच्या तिजोरीतील सर्वाधिक रक्कम ही कर्ज फेडण्यासाठीच वापरात आणली जात असून, येत्या काळात पाकिस्ताननं 9700 अब्ज रुपयांच्या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित आहे. तेव्हा आता या आव्हानाचा सामना पाकिस्तान सरकार नेमकं कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.