इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत निकाल हाती आलेले नव्हते. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग, नवाज गट हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून बिलावल भुत्तोंचा पीपीपी तिसऱ्या स्थानी राहण्याचा अंदाज आहे. आताचा कल कायम राहिल्यास इम्रान खान यांना पंतप्रधान होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याच्या पक्षाची संपूर्ण धुळधाण झालीये. त्याच्या अल्लाह हू अकबर तहरीक या पक्षाला आतापर्यंत एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.


हिंसाचाराचं गालबोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पाकिस्तानमधल्या निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट लागलंय. क्वेट्टा इथं झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ३१ जण ठार झालेत. तर अनेक जण या हल्ल्यात जखमी झालेत. याखेरीज देशभरात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या असून मृतांचा एकूण आकडा ३५ असल्याची माहिती आहे. इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेनं क्वेट्टामधल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीये. अतिरेकी कारवाया टाळण्यासाठी तब्बल ३ लाख ७१ हजार जवान देशरातल्या मतदानकेंद्रांवर तैनात करण्यात आले होते. मात्र तरीही हिंसाचाराला आळा बसू शकलेला नाही.


 २७२ जागांसाठी मतदान


पाकिस्तानमध्ये आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.  पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक झाली.  २७२ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हे इम्रान खानच्या पार्टीच्या बाजुने लागलेत. इम्रानच्या पक्षाने १०२ जागांची आघाडी घेतली आहे. 


आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग, नवाज गट हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून बिलावल भुत्तोंचा पीपीपी तिसऱ्या स्थानी राहण्याचा अंदाज आहे. आताचा कल कायम राहिल्यास इम्रान खान यांना पंतप्रधान होण्याची मोठी संधी निर्माण झालीये.


इम्रान खानचा राजकीय पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) १०२  जागा मिळवून हा सध्या एक नंबरवर आहे. तर नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग ही पार्टी दोन नंबर असून ७२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर बिलावल भुत्तो यांची पार्टीने ३९ जागांवर आघाडी घेत तीन नंबरवर आहे. दरम्यान, अन्य ५१ जागांवर आघाडीवर आहे. तर दहशतवादी हाफीस सईद याच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.


पक्षीय बलाबल


एकूण जागा २७२
बहुमताचा आकडा १३७
PTI - इम्रान खान  -  १०२ 
PML-N - नवाझ शरीफ - ७२
PPP - बिलावर भुत्तो झरदारी  - ३९
अन्य - ५१