Pakistan नं अखेर स्वीकारलं; 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच दहशतवाद्याचा मृतदेह घेतला ताब्यात
भारतीय जवानांनी रक्तदान करत केलेला दहशतवाद्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न.... इथे माणुसकी जिंकली पण....
Pakistan Terrorist dead in Kashmir : पाकिस्तान दहशतवादाला कायम खतपाणी घालत असल्याचं आपण पाहिलं आणि ऐकलं आहे. दहशतवादी (Terrorist) हल्ला पाकिस्तानने (Pakistan) घडवून आणला असं अनेकदा सिद्ध देखील झालं, पण पुरावे मिळूनही त्यांनी ते कधीच मान्य केले नाही. पण आता जवळपास 20 वर्षांनंतर पाकिस्तानने माणुसकी दाखवली आहे. दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच, पाकिस्तानने सोमवारी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी गटाच्या प्रशिक्षित एजंट आणि मार्गदर्शकाचा मृतदेह स्वीकारला आहे.
लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) घुसला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तबराक हुसैनचा (32) लष्करी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यूच्या दोन दिवसांनंतर दहशतवाद्याचा मृतदेह पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आला. (The body of the terrorist was handed over to Pakistan)
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील कोटली येथील सब्जकोट गावातील रहिवासी असलेल्या हुसैनला गेल्या महिन्यात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करताना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. (Terrorist attack on camp)
गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्याला वाचविण्यासाठी भारतीय जवानांनी रक्तदानही केलं. पण तो वाचू शकला नाही. हुसेनचे पार्थिव भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Pakistan Terrorist body)
भारतीय लष्कराच्या (Indian Army) अधिकाऱ्याने सांगितले की, पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील चाकण दा बाग या ठिकाणी पोलीस आणि नागरी अधिकाऱ्यांच्या समक्ष हा मृतदेह पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्वीकारला.
दोन दशकांहून अधिक काळातील ही पहिलीच घटना असावी, जेव्हा पाकिस्तानने भारताकडून एखाद्या दहशतवाद्याचा मृतदेह (Dead body of a terrorist) स्वीकारला आहे. याआधी पाकिस्तानने कायम दहशतवादी कारवायांतील दहशतवाद्यांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला, असं देखील लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.