पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या नातीकडून लग्नानंतर शिवलिंगावर दुग्धाभिषेक; सोशल मीडियावर खळबळ
Fatima Bhutto Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दिवंगत जुल्फिकार भुट्टो (zulfikar ali bhutto) यांची नात फातिमा भुट्टो सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे फातिमा भुट्टो (Fatima Bhutto) आपल्या पतीसह हिंदू मंदिरात (Hindu Temple) पोहोचली होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) झाले आहेत.
Fatima Bhutto Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दिवंगत जुल्फिकार भुट्टो (zulfikar ali bhutto) यांची नात फातिमा भुट्टो सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे फातिमा भुट्टो (Fatima Bhutto) यांनी लग्न केल्यानंतर आपल्या पतीसह हिंदू मंदिराला (Hindu Temple) भेट दिली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) झाले आहेत. एकीकडे काहीजणांनी तिचं कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे तिला ती नेमकी कशासाठी तिथे गेली होती अशी विचारणा केली. पण या फोटोंमुळे शोसल मीडियावर खळबळ माजली आहे.
40 वर्षीय फातिमा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दिवंगत बेनजीर भुट्टो यांची नात असून मुर्तजा भुट्टो यांची मुलगी आहे. शुक्रवारी कराचीमध्ये अत्यंत साध्या पद्दतीने तिचं लग्न पार पडलं.
फातिमा आणि तिचा पती ग्राहम जिब्रान रविवारी कराचीमधील ऐतिहासिक मंदिरात पोहोचले होते. हिंदू सिंधींच्या सन्मानार्थ त्यांनी मंदिराला भेट दिल्याची माहिती आहे. या मंदिराची मुळे प्राचीन काळाशी जोडलेली आहेत. दरम्यान माहितीनुसार, फातिमाचा पती ग्राहम जिब्रान ख्रिश्चन असून अमेरिकेचा नागरिक आहे.
फातिमासह यावेळी तिचा भाऊ जुल्फिकार अली भुट्टादेखील उपस्थित होता. यासह काही हिंदू नेत्यांनीही या लग्नाला हजेरी लावली. तिने आणि तिच्या पतीने यावेळी शिवलिंगावर दूध अर्पण केलं.
फातिमा आणि तिच्या पतीचा मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कमेंट केल्या जात आहेत. काहींनी त्यांचं कौतुक केलं असून फार उत्तम कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. मात्र काही युजर्सनी ते मंदिरात नेमकं कशासाठी गेले होते अशी विचारणा केली आहे. 'या परंपरेचा अर्थ काय,' अशी विचारणा एका युजरने केली आहे. तर एकाने म्हटलं आहे की, सिंधी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हिंदूवादाचं अनुसरण करणं असतो का?
पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात भुट्टो कुटुंबाचं वेगळं महत्त्वं आहे. त्यांची सध्याची पिढीही राजकारणात सक्रीय आहे. पण फातिमा भुट्टोने मात्र स्वत:ला राजकारणापासून वेगळं ठेवलं आहे. फातिमा भुट्टोने लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती राजकीय चर्चांपासूनही दूर असते. तसंच पाकिस्तानच्या पारंपारिक राजकीय प्रणालीवर टीका करत असते.
29 मे 1892 रोजी फातिमा यांचा जन्म झाला असून, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. यामध्ये 'सॉन्ग्स ऑफ ब्लड एंड स्वॉर्ड' अशा पुस्तकांचा समावेश आहे. यासह 'द शैडो ऑफ द क्रिसेंट मून' या पुस्तकाचाही समावेश आहे.