आजीच्या निधनाआधी लखपती कसं व्हायचं? पाकिस्तानमधील लोक Google वर करतात सर्च; अजून कोणते प्रश्न पडतात वाचा
Pakistan Google top searches 2024 : अमुक एक गोष्ट कशी करायची, पैसे कसे कमवायचे इथपासून अनेक प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात घर करत होते. याच प्रश्नांची उत्तरं मिळवम्यासाठी अनेकांनी थेट गुगलचीच मदत घेतली.
Pakistan Google searches 2024: जगाच्या पाठीवर असा क्वचितच एखादा प्रश्न असेल ज्याचं उत्तर गुगलकडे नाही. कितीही कठिणातील कठीण प्रश्न असो, त्या प्रश्नाचं उत्तर गुगलकडे हमखास मिळतं. ब्रेकअपपासून, क्रिकेट मॅचपर्यंत आणि स्किनकेअरपासून शिक्षणासंबंधीच्या प्रश्नापर्यंत गुगल कायमच युजर्सच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी सज्ज असतं. अशा या माध्यमाचा वापर जगातील अनेक मंडळी करतात. पाकिस्तानातही गुगलचा मोठा वापर केला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तनातील युजर्सना पडणारे प्रश्नही अतिशय अनपेक्षित आहेत बरं.
2024 या वर्षभरात पाकिस्तानी नागरिकांनी गुललला असे काही प्रश्न विचारले की, हे पाहून सध्या एकच हशा पिकतोय. क्रिकेटचा सामाना कुठे आणि कसा पाहावा या प्रश्नासमवेतच कार खरेदीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं इथं गुगललला विचारण्यात आली.
2024 मध्ये पाकिस्तानमधून गुगलला विचारण्यात आलेले सर्वाधिक प्रश्न
वर्ल्डकप सामान्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहावं? - भारताप्रमाणं पाकिस्तानमध्येही क्रिकेट लोकप्रिय खेळ असून, इथं वर्ल्डकपची Live मॅच पाहण्यासाठी उत्सुकता होती.
आजीच्या निधनाआधी लखपती कसं व्हायचं?- हा काहीसा अनपेक्षित प्रश्न, पण आजीच्या निधनाआधी लाखो रुपये कसे कमवावेत याचं उत्तर इथं मंडळींना हवं होतं.
जुनी कार कशी खरेदी करावी?
PC मध्ये युट्यूब व्हिडीओ कसा डाऊनलोड करावा?
गुंतवणूक न करता पैसे कसे कमवावेत?
मतदानकेंद्राची पडताळणी कशी करावी?
जास्त काळ फुलं कशी ताजी ठेवावीत?
गुडघे दुखापतीनंतर व्यायाम कधी सुरू करावा?
मुलांना कोणत्याही गोष्टीला दुसऱ्यांसमवेत वाटून घ्यायला कसं शिकवावं?
पँटवर लागलेला गवताचा डाग कसा घालवावा?
हेसुद्धा वाचा : बापरे! हिंस्र जंगली प्राण्यांनी 4 वर्षीय चिमुकल्याला घराच्या अंगणातून पळवलं? 'या' गावात दहशतीचं वातावरण
पाकिस्तानमधील नागरिक कायमच काही ना काही नव्या कारणांनी चर्चेत असतात. यावेळीसुद्धा ही मंडळी त्यांच्या चित्रविचित्र प्रश्नांसाठी चर्चेत आली आहेत.