नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. या वेबसाईटवर तिरंग्यासोबत जन-गण-मन लिहिण्यात आलं होतं. तसंच या वेबसाईटवर हॅपी इंडिपेंडन्स डे असंही लिहिलं गेलं होतं. याचबरोबर तिरंग्यासोबत असलेल्या अशोकचक्रावर महात्मा गांधी आणि भगतसिंग यांचा फोटोही लावण्यात आला होता.



आज दुपारी २.४५ मिनीटांनी वेबसाईट हॅक झाली होती. पण साईट हॅक झाल्याचं लक्षात आल्यावर थोड्याच वेळात वेबसाईट पूर्ववत करण्यात आली. पाकिस्तानी वेबसाईट हॅक होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी दोन महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या ३० सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या होत्या. याआधी पाकिस्तानी हॅकर्सकडूनही भारतीय वेबसाईट हॅक करण्यात आल्या होत्या.