लाहोर : महागाईमुळे भारतात भाज्यांचे दर कडाडले आहेत. पण, भारताचा शेजारी पाकिस्तानातही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. इतके की, पाकमध्ये टोमॅटो चक्क ३०० रूपये प्रति किलोने विकला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानील महागाईने नवा उच्चांग गाठला असून, सर्वसामान्यांच्या भाजीपाल्यातून टोमॅटो केव्हाच हद्दपार झाला आहे. पाकिस्तानातील काही भागात टोमॅटो चक्क ३०० रूपये प्रति किलो दराने विकाला जात आहे. देशात टेमॅटोचा तुटवडा निर्माण झाल्याने हे दर कडाडले आहेत. पाकिस्तानातील अनेक तज्ज्ञांचे म्हणने आहे की, शेजारील राष्ट्र असलेल्या भारताकडून टोमॅटो आयात करावा. पण, पाकचे अन्नपूरवठा मंत्री सिंकदर हयात बोसन यांनी एक्सप्रेस ट्रिब्यूनला दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेवर लावण्यात आलेल्या बंदीमुळे भारतातून टोमॅटो आयात केले जाणार नाहीत.


दरम्यान, पाकिस्तानात दरवर्षीच टोमॅटोचा तूटवडा असतो. हा तूटवडा भरून काढण्यासाठी पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर भारतातून टोमॅटो आयात करतो. बोसन यांनी सांगितले आहे की, बलुचिस्तानमधील टोमॅटो काही दिवसातच तयार होतील. हे टोमॅटो एकदा का तयार होऊन मार्केटला आले की, पाकिस्तानातील टोमॅटो आणि कांद्याचीही समस्या निकालात निघेल. मीडिया रिपोर्टनुसार टोमॅटोची भुसार बाजारातील किंमत ही १३२ ते १४० रूपये प्रति किलो असायची. पण, अलिकडील काळात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत.


दरम्यान, लाहोर चेंम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (एलसीसीआय) भारतातून टोमॅटो आयात न करण्याच्या सरकारी निर्णयाचे स्वागत केले आहे. हे स्वागत करताना पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलल्यामुळे पाकचे विदेशी चलन वाचेल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे म्हटले आहे.