Pakistan Politics over Sunny Leone: पाकिस्तानमधील आर्थिक संकटाबरोबरच राजकीय संकटही (Pakistan Politics) चर्चेत आहे. येथील राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप करण्याची स्पर्धाच सुरु आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांच्या पाकिस्तान एहरीक-ए-इंन्साफ पक्षाचे (PTI) नेते फैयाज उल हसन (Fayyaz Ul Hassan) यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज (Maryam Nawaz) यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) उल्लेख केला आहे. सनी लिओनीचा उल्लेख करत पाकिस्ताने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि विद्यमान सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या मरियम नवाज यांच्यावर टीका केल्याने पाकिस्तानमधील वातावरण चांगलेच तापले आहे.  


वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी वृत्तवाहिनी कॅपिटल टीव्हीवरील चर्चेदरम्यान हसन यांनी ही टीका केली. मरियम नवाज यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना पुढे, "लाज वाटली पाहिजे तुझा बाप सुल्तान मफरुर आहे. 4 आठवडे सांगून तो 4 वर्षांपासून देशाबाहेरुन आलेला नाही. तो संपूर्ण पाकिस्तानच्या स्वप्नांना चूना लावून गेला. पाकिस्तानमधील सर्व संस्थांना चूना लावून 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आश्वास देऊन गेला. त्याला या 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जामीन मंजूर करणारं कोण होतं तर शहबाज शरीफ," असा टोला हसन यांनी लगावला.


इम्रान खान यांचा उल्लेख करत टोला


"सुल्तान मजबूर शहबाज शरीफने जामी देताना म्हटलं होतं की मी शब्द देतो पण यांना जाऊ द्या ते 4 आठवड्यांमध्ये परत येतील. बेगम सफदरच्या नशिबात केवळ इम्रान खान येतात. त्या सकाळ-संध्याकाळ इम्रान-इम्रान करत असतात. बेगम शफदर नेहमी म्हणतात तुम्ही इम्रान खान, तुमचा इम्रान खान, हा इम्रान खान, तो इम्रान खान, याला पकडा, त्याला अटक करा, याला न्यायालयात खेचा. त्यांचं मन मानत नाही. त्यांचं मन (इम्रान यांच्याशिवाय) लागत नाही," अशा खोचक शब्दांमध्ये हसन यांनी टीका केली आहे.


डाकूराणी असा उल्लेख


"तुम्ही दररोज कोणाचा ना कोणाचा तरी ऑडिओ रिलीज करता. त्या सांगतात की त्यांच्याकडे जनरल फैज यांच्याविरोधात पुरावा आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की इम्रान खान यांच्याकडेही अनेक पुरावे आहेत," असा इशारा हसन यांनी दिला. त्यांनी मरियम नवाज यांना डाकू असल्याचा टोलाही लगावला. "डाकूराणीने पाकिस्तानमध्ये एक नव्या प्रकारचं राजकारण सुरु केलं आहे. ज्यामध्ये त्या स्वत:ची लाज काढून घेत असून स्वत: गाडल्या जात आहेत," असंही हसन म्हणाले. 


हे म्हणजे सनी लिओनीकडून...


मरियम नवाज हा नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत. सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या असलेल्या मरियम नवाज यांनी इम्रान खान यांना लक्ष्य करताना त्यांनी हसन यांनी टीका करताना, इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांच्याकडून हिंमत उधार घेऊन संकटांचा सामना केला पाहिजे असा टोला वडिलांचा संदर्भ देत लगावला होता. याच टीकेवरुन हसन यांनी मरियम यांच्यावर टीका केली. "काल बेगम सफदर यांनी इम्रान खान यांच्यावर टीका करताना त्यांनी हिंमत नवाज शरीफ यांच्याकडून उधार घेतली पाहिजे असं म्हटलं. हे म्हणजे असं सांगण्यासारखं आहे की प्रतिष्ठा (लाज-लज्जा) सनी लिओनीकडून उधार घेण्यासारखं आहे," असा टोला हसन यांनी लगावला. यावरुन आता सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत थेट पूर्वी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव घेत टीका टीप्पणी केल्याने संताप व्यक्त केला आहे.