पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अर्शद नदीम ट्रोल, व्हिडिओत येत होते असे आवाज...
Arshad Nadeem Viral Video : भारताच्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यंदाचा स्वातंत्र्य दिन पाकिस्तानसाठी खास होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्डन बॉय अर्शद नदीमने पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिलं.
Trending Video : पाकिस्तानचा गोल्डन बॉय अर्शद नदीमने (Arshad Nadeem) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) सुवर्ण पदक मिळवून दिलं. या सुवर्ण कामगिरीनंतरच्या पहिल्या स्वतंत्र्यदिनाच्या भाषणात नदीमने पाकिस्तानच्या नागरिकांना संदेश दिला. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वतंत्र्य दिवस आहे. या निमित्ताने अर्शद नदीमने एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने नदीमला ट्रोल केलं आहे. 27 वर्षांच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 92.97 भाला फेकत नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित केला. टोकिया ऑलिम्पिकमध्ये सुवर्पण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला त्याने मागे टाकलं. नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
अर्शद नदीमचा स्वतंत्रता दिन संदेश
पाकिस्तानच्या स्वतंत्र्य दिनानिमित्ताने अर्शद नदीमने सोशल मीडियावर एक व्हडिओ (Arshad Nadeem Video) शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्शद नदीमने सफेद शर्ट आणि हिरव्या रंगाचा टाय परिधान केलेला आहे. त्याने पाकिस्तानमधल्या सर्व नागरिकांनी स्वतंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत अर्शद नदीमने सर्व पाकिस्तानी नागरिकांना एकजूटीने राहण्याचं आव्हान केलं. ज्याप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्ण पदक जिंकल्यानंतर संपूर्ण देश एकजूट झाला होता त्याचप्रमाणे पाकिस्तानी नागरिकांनी कायमची एकजुटता दाखवावी, स्वतंत्र्य दिनानिमित्ताने सर्व नागरिकांनी एकजूट राहाण्याची शपथ घेण्याचं आवाहन करतो असं अर्शद नदीने या व्हिडिओ म्हटलंय.
व्हिडिओत विचित्र आवाज
अर्शद नदीमने पाकिस्तानी नागरिकांना स्वातंत्र्यदिनानिमित्ताने संदेश दिला आहे, पण या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे. अर्शद नदीम बोलत असताना बॅकराऊंडला चक्क कोणीतरी घोरत असल्याचा आवाज येत आहे. अर्शद नदीम बोलताना मागे कोणीतरी झोपलेलं आहे. विशेष म्हणजे अर्शद नदीमने हा व्हिडिओ शेअर करताना तो तपासलाही नाही. तसाच सोशल मीडियावर शेअर केला. अर्शद नदीमच्या व्हिडिओत घोरण्याचा आवाज येत असल्याने युजर्सनाही हसू आवरत नाहीए.
अर्शद नदीमची सुवर्ण कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानाच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक विक्रमाला गवसणी घातली. अर्शद नदीमने 92.97 भाला फेकत सुवर्ण पदक पटकावलं. विशेष म्हणजे अंतिम फेरीत त्याने सहाव्या प्रयत्नात 91.79 भाला फेकत दुसरा सर्वश्रेष्ठ ऑलिम्पिक विक्रम रचला. या सुवर्ण कामगिरीनंतर पाकिस्तानात अर्शद नदीमचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याच्यावर पैशांची आणि बक्षिसांची अक्षरश: बरसात झाली.