मुंबई : पाकिस्तानचा मित्र पक्ष म्हणजे मलेशियाने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. मलेशियाने पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७७७ प्रवासी विमान जप्त केले आहे. पाकिस्तान आधिच आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यानंतर आता मित्र पक्षाने दिलेल्या झटक्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान भाडेतत्त्वावर घेतले होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पाकिस्तानने विमानाचे पैसे न दिल्यामुळे मलेशियाने विमान जप्त केले आहे. ज्यावेळी ही जप्तीची कारवाई करण्यात आली तेव्हा विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते. पण त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले आहे. सध्या याप्रकणी ब्रिटनच्या न्यायालयात खटला सुरु आहे.


पाकिस्तानी वर्तमानपत्र डेली टाइम्सच्या वृत्तानुसार,पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाइन्सच्या ताफ्यात एकूण १२ बोईंग ७७७ विमाने आहेत. ही सर्व विमानं वेगवेगळ्या कंपन्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. करारानुसार भाडे न भरल्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.


महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तानला दिलेले ३ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करायला सांगितली. ही परतफेड करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून कर्ज घेतले असून कर्ज फेडले आहे.