मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, सुरक्षा संस्थांनी संकेत दिले आहेत की आता पाकिस्तानने भारताविरोधात मोठे कट रचण्यास सुरुवात केली आहे. भारताविरूद्ध कारवाया करण्यासाठी दहशतवादी तळ पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पूर्व आणि दक्षिण भागात हलवण्यास सुरुवात केली आहे. 'झी मीडिया'ला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने लष्करचे अनेक तळ अफगाणिस्तानच्या पूर्व भागात हलवले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे जैशचे तळ अफगाणिस्तानच्या दक्षिण भागात हलवण्यात आले आहेत. लष्कर आणि जैशच्या सर्व दहशतवाद्यांना भारत आणि आफगाणिस्तानमध्ये हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानातून अफगाणिस्तानात दहशतवादी तळ हलवण्यामागे सर्वात मोठे कारण ते म्हणजे, पाकिस्तान फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ते सांगू इच्छितात की आमचे देशात दहशतवादी तळ नाहीत आणि त्यांच्यासोबत काही संबंध नाही. 


पाकिस्तानच्या ISI ने अफगाणिस्तानमध्ये बदलत्या वातावरणाचा फायदा घेण्यास सुरूवात केली आहे. ISI आता हक्कानी नेटवर्कच्या मदतीने लष्करचे तळ  अफगाणिस्तानच्या पूर्व भागात हलवले जात आहेत, शिवाय तालिबानच्या मदतीने जैशचे दहशतवादी तळ अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे हलवले जात आहे.


यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जैश आणि तालिबान यांच्यात चांगले संबंध आहेत. याआधीही दोघांनी मिळून अफगाण सैनिकांवर अनेक हल्ले केले होते. विशेष म्हणजे तालिबानचे अनेक राज्यपाल जैशचे दहशतवादी होते.