कराची : भीषण स्फोटानं कराची हादरली आहे. या स्फोटात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इमारतीमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन दल घटनास्थळी दाखल झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीषण स्फोटानं इमारतीचा भाग कोसळला आहे. आपात्कालिन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची राजधानी कराची इथे एकामागोमाग दोन भीषण स्फोट झाले. 


ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे जखमी झालेल्या लोकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार कराची इथल्या शेरशाह परिसरात हा भीषण स्फोट दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. पहिला स्फोट आधी झाला. त्यानंतर दुसरा स्फोट हा रेस्क्यू ऑपरेशन करताना झाला आहे. 


हा स्फोट गॅस लिक झाल्यामुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जिथे हा स्फोट झाला ती इमारत अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. नोटीस देऊनही इमारत रिकामी न केल्याने लोकांना जीव गमवण्याची वेळ आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.