Pakistan : गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शेजारील देशांमध्ये महागाईमुळे (Inflation) जनता सरकारच्या विरोधात उतरली होती. दिवाळखोरीनंतर श्रीलंकेत (sri lanka) जनतेने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आंदोलन केले आणि त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. चीनकडून (China) घेतलेल्या कर्जामुळे श्रीलंकेवर ही परिस्थिती ओढवली असे तज्ज्ञांचे मत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेतील सरकारने चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन भरपूर गुंतवणूक केली पण त्यांना परतावा मिळाला नाही. त्यानंतर हेच कर्ज श्रीलंकेच्या संकटाचे प्रमुख कारण बनले. चीनच्या अनेक छोट्या देशांना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढलं त्या देशांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


भारताचा शेजारी देश पाकिस्तानही (Pakistan) चीनच्या कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. पाकिस्तनामध्येही महागाईच्या मुद्दावरुन नवीन सरकार सत्तेवर आलं आहे. मात्र अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही.


पाकिस्तानातील कराची (Karachi) शहरातील एका महिलेने पाकिस्तानची आर्थिक स्थिती उघड केली आहे. या महिलेचा व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहे. या महिलेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही सुनावले आहे. महिलेने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


बऱ्याच वेळापासून पाकिस्तान आर्थिक संकट आणि महागाईखाली दबलेला आहे. काही तज्ज्ञांनी पाकिस्तानची श्रीलंकेप्रमाणे अवस्था होण्याची भीती व्यक्त केली आहे. यादरम्यान, एका गृहिणीने बाजारातून सामान घेऊन परल्यानंतर आपलं दुःख व्यक्त केलं आहे.


पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार हामीद मीर यांनी या महिलेचा व्हिडीओ ट्विट करत म्हटले आहे की, या महिलेचे म्हणणे संपूर्ण पाकिस्तानने ऐकायला हवे. राबिया नावाच्या या महिलेचे म्हणणे आहे की, शाहबाज शरीफ आणि मरियमसारख्या जबाबदार पदांवर असलेल्या लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर आपला खर्च कसा भागवायचा हे सांगावे. त्यानंतर राबियाने बाई भावूक होऊन मी माझ्या मुलांना खायला घालायचे की त्यांना मारुन टाकायचे? असा सवाल केला आहे.



या महिलनेने तिला दोन मुलं असल्याचंही म्हटलं आहे. एका मुलाला फीट येते आणि त्याच्या उपचारासाठीच्या औषधांचा खर्च गेल्या चार महिन्यांत प्रचंड वाढला आहे. "मी माझ्या मुलासाठी औषधे खरेदी करणे टाळू शकतो का? सरकारने गरीब लोकांचा बळी घेतला आहे. खरंच तुम्हाला देवाची भीती वाटत नाही का?" असा सवालही या महिलेने केला आहे.