Pakistan Viral Video Narendra Modi: पाकिस्तानी युट्यूबर सना अहमदने (Pakistani Youtuber Sana Ahmed) पोस्ट केलेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत पाकिस्तानमधील एक व्यक्ती आपल्या देशातील नेत्यांवर प्रचंड टीका करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) कौतुक करत आहे. जर नरेंद्र मोदी आपल्या देशाचे प्रमुख असते तर आज आमची स्थिती चांगली असं ही व्यक्ती सांगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सना अहमदने अनेक पाकिस्तानी वृत्तसंस्थांमध्ये काम केलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सना अहमद एका स्थानिक व्यक्तीला विचारते की ‘रस्त्यांवर पाकिस्तानमधून जिवंत बाहेर पडा, हवं तर भारतात जावा’ अशा घोषणा का दिल्या जात आहेत? त्यावर तो व्यक्ती आपण पाकिस्तानमध्ये जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं असं म्हणतो. 


‘पाकिस्तान जिंदाबाद टू पाकिस्तान से जिंदा भाग’ कार्यक्रमाच्या होस्टकडे आपली नाराजी जाहीर करताना ही व्यक्ती पुढे म्हणते की "यापेक्षा तर नरेंद्र मोदी चांगले आहेत. तेथील लोक त्यांना किती मानतात. आम्हालाही मोदी हवेत. आम्हाला ना नवाज शरीफ हवेत. ना बेनजीर, ना इम्रान खान हवे आहेत. आम्हाला जनरल मुशर्ऱफही नकोत. आम्हाला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत. जे या देशातील लोकांना नीट करतील".


जर आपण भारताशी मैत्री केली तर चिकन, टोमॅटो, कांदा, बटाटा सर्व काही स्वस्त होईल अशी आशाही तो व्यक्त करतो. पुढे तो म्हणतो की "आपली खोटा अभिमान बाजूला ठेवा. भारताशी मैत्री करा, तो मोठा भाऊ आहे. आपल्यापेक्षा फार मोठा आहे".



"आम्ही भारतात राहिलो असतो तर बरं झालं असतं"


ही व्यक्ती पुढे सांगते की "आम्ही भारतात राहिलो असतो तर बरं झालं असतं. 1947 मध्ये आम्हाला सोबतच स्वातंत्र्य मिळालं होतं. जर दोन्ही देश एकत्र असतो तर आज आम्हाला टोमॅटो 20 रुपये किलो, 150 रुपये किलो चिकन आणि 150 रुपये प्रतीलिटर दराने पेट्रोल मिळालं असतं. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. मोदी पाकिस्तानला संकटातून बाहेर काढू शकतात".


पाकिस्तानमधील सध्याचं सरकार खोटी आश्वासनं देत असून, चुकीच्या मार्गावर नेत आहे. आम्हाला एक इस्लामी राष्ट्र मिळालं असून आपण इथे इस्लामची स्थापन करु शकलो नाही हे दुर्देव आहे अशी टीकाही त्याने केली आहे. 


भारतात शांततेत राहण्यासाठी नरेंद्र मोदींचं शासन स्वीकारणार का? असं विचारलं असते तो सांगतो की, 'नक्की! मोदी साहेब महान व्यक्ती आहेत. ते अजिबात वाईट व्यक्ती नाहीत. भारतीय मुस्लिमांना पेट्रोल आणि चिकन 150 रुपयांना मिळत आहे. आपणही भारताचे मुसलमान होऊ शकलो असतो. आम्हाला काय फरक पडतो?". ते पुढे म्हणाले, "पाकिस्तानी नागरिकांनी आपली भारताशी तुलना करणे थांबवावे कारण दोन्ही देशांची तुलना होऊ शकत नाही."