AshadhiWari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?

आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे.  

Jul 04, 2024, 12:27 PM IST

'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.

1/8

'संत तुकाराम महाराज' जेव्हा पंढरपूरला जायचे तेव्हा ते देहू वरून आळंदीला जायचे. 'संत ज्ञानेश्वर माऊलीं'च्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असत.   

2/8

तुकोबांनंतर ही परंपरा त्यांचे पुत्र 'नारायण महाराज' यांनी सुरू ठेवली. 

3/8

नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते 'संत ज्ञानेश्वर माऊली' यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे. 

4/8

काही वर्षांनी 'श्री गुरु हैबत बाबा' यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा स्वतंत्र असा पालखी सोहळा सुरू केला. 'श्री गुरुहैबत बाबा' हे शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते. 

5/8

असं म्हणतात की सुरुवातीच्या दिवसांमध्ये 'माऊलींच्या पालखी सोहळ्या'त हत्ती देखील चालायचे. 

6/8

'श्रीगुरु हैबत बाबा' यांनी या पालखी सोहळ्याला 'राजाश्रय' मिळावा यासाठी शिंदे सरकारकडे मागणी केली.   

7/8

'शिंदे सरकार' यांच्या दरबारात 'शितोळे सरकार' होते.  शितोळे सरकार यांनी ही जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून 'ज्ञानेश्वर माऊली' यांच्या पालखी सोहळ्याला एक सुसूत्रता आली. 

8/8

मुळात श्री गुरुहैबत बाबा हे राज दरबारी एक 'सैनिक' होते. त्यानुसारच त्यांनी या पालखी सोहळ्याला एक शिस्तबद्ध एक आखणी आखून दिली. दिंड्यांचे क्रम घालून दिले. वारकऱ्यांना चालण्याची एक मांडणी आखून दिली.