लाहोर: भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला तर युद्धाला तोंड फुटेल. यानंतर पाकिस्तान युद्धात उतरला तर संपूर्ण भारतीय उपखंडाचा नकाशा बदलून जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, काश्मीरमध्ये आल्यानंतर भारताचा अजेंडा पूर्ण होईल, या भ्रमात राहू नकात. भारत आता पाकव्याप्त काश्मीरवर चढाई करण्याचा विचार करत असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, पाकव्याप्त काश्मीरवरील हल्ला हा संपूर्ण देशावरील हल्ला समजला जाईल. पाकिस्तान मोठा देश आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास संपूर्ण भारतीय उपखंडाचे चित्र बदलून जाईल, असे शेख रशीद यांनी सांगितले. 


तर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारणासंबंधीच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनीही पुन्हा एकदा युद्धाचा राग आळवला. काहीही झाले तरी पाकिस्तान युद्ध पुकारणार नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणार नाही. पण युद्धासारखी स्थिती निर्माण झाली तर प्रत्येक पाकिस्तानी आपल्या सैन्यासोबत लढेल. आम्हीच या युद्धाचा शेवट करू, असे फिरदौस आशिक अवान यांनी म्हटले. 


 'जगाने भारताच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवावी'; इम्रान खान घाबरले


जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान प्रचंड बिथरला आहे. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताला युद्धाची धमकी दिली होती. भारताने यावेळी बालाकोटपेक्षा धोकादायक रणनीती आखली आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्ण जगाची असेल. आम्ही तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत, असे त्यांनी सांगितले होते. 


VIDEO: भारतविरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी जमावाला भाजप आणि संघाचे नेते भिडले